29.8 C
Mumbai
Friday, November 6, 2026
घरराजकारणसोमय्यांनी आरोप केलेले प्रवीण कलमे म्हणाले .....

सोमय्यांनी आरोप केलेले प्रवीण कलमे म्हणाले …..

Google News Follow

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रवीण कलमे यांच्यावर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. “माझ्या विरोधात आरोप करणारे प्रवीण कलमे आता कुठे आहेत? त्यांना सरकारी कार्यालयातून कागद चोरताना पकडण्यात आलं होतं. तसंच जितेंद्र आव्हाड हे प्रवीण कलमे यांच्याविषयी माहिती देणार का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर प्रवीण कलमे हे माध्यमांसमोर आले आणि त्यांनी किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप हे हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे.

किरीट सोमय्या यांनी कलमे यांच्यावर आरोप केल्यानंतर प्रविण कलमे यांनी, “जी व्यक्ती काही दिवसांपूर्वी स्वतः फरार होती ती मला फरार घोषित करण्याची मागणी करत आहे आणी हे हास्यास्पद आहे, असे म्हटले आहे. मी कामानिमित्त बाहेर फिरत असतो, मी बऱ्याच दिवसांपासून बाहेर फिरत आहे,” असे कलमे म्हणाले. तसेच आपल्या विरोधात एफआयआर दाखल झाल्याचे किरीट सोमय्या यांच्या आजच्या पत्रकार परीषदेतून कळले, असा दावाही केला आहे.

हे ही वाचा:

रामनवमीच्या गदारोळानंतर जेएनयूमध्ये फडकले भगवे झेंडे

‘देशातल्या मोठ्या नेत्यांना मंदिरात जाण्याची लाज वाटायची’

शांघायमध्ये लॉकडाऊनमुळे होतेय लोकांची उपासमार

एसटी कर्मचारी आत्महत्या प्रकरणी सुओ मोटो खटला भरा!

“मला कळत नाही की, एफआयआरची कॉपी सोमय्या यांच्याकडे कशी आली माझ्या एनजीओच्या कामासाठी बाहेर फिरत राहवं लागतं, मी माझ्या फोनवर आणि ईमेलवर उपलब्ध आहे. असे असताना फरार कसं काय ठरवणार? ही एफआयआरची प्रत त्यांच्याकडे कशी गेली, हे मुंबई पोलिसांचा भाग कधी झाले? असा सवाल कलमे यांनी केला आहे. एफआयआर दाखल झाल्याचे कळलंच नाही. मी सध्या मिडल ईस्टमध्ये आहे आणि काम झालं की मुंबईला परत येणार असल्याचे प्रवीण कलमे म्हणाले. तसेच आपल्यावर दाखल असलेला एफआयआर खरा आहे की खोटा याची पडताळणी करायला हवी, असेही प्रवीण कलमे म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा