28 C
Mumbai
Wednesday, April 1, 2026
घरराजकारण'नवं सरकार सर्वसामान्यांचं आहे'

‘नवं सरकार सर्वसामान्यांचं आहे’

Google News Follow

Related

राज्यात शिंदे आणि फडणवीस यांनी केलेलं सरकार हे सर्वसामान्य जनतेचं आहे. येणाऱ्या काळात सरकारकडून जनतेसाठी अनेक चांगली कामे होणार आहेत, असा विश्वास प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादीकडून मतदार संघात निधी मिळत नव्हता, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बच्चू कडू यांनी कौतुक केले आहे. ते म्हणाले, शिंदे आणि फडणवीस फेविकॉलपेक्षा मजबूत जोड आहे. तसेच सरकार कोसळणार असं सांगणं हे विरोधकांचं कामचं असत, त्याकडे जास्त लक्ष द्यायचे नसते, असे ते म्हणाले आहेत.

तसेच सरकारमध्ये कोणतं मंत्रिपद मिळणार याबाबत बच्चू कडू यांना विचारलं असता, ते म्हणाले, मंत्रिपदापेक्षा मतदार संघातील विकास महत्वाचा असतो. तसेच माझ्यासाठी दिव्यांगांचा विषय महत्वाचा आहे. कुणाला कोणतं मंत्रिपद मिळतंय याकडे लक्ष देत नाही. दिव्यांगांसाठी वेगळा विभाग बनवून त्याचा चार्ज जर माझ्याकडे दिला तर नक्कीच त्यासाठी चांगलं काम करता येईल, अशी इच्छा बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा:

वीर सावरकरांचे विचार आम्हाला महाविकास आघाडीत असताना मांडता येत नव्हते!

ब्रिटनच्या आरोग्य सचिव, अर्थमंत्र्यांनी दिला राजीनामा

रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडिजचा स्पीड फिका पडला…

उद्धवजी, मुर्मूना पाठिंबा द्या! खासदार राहुल शेवाळे यांचा लेटरबॉम्ब

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पेशावरून टीका केली होती. त्यावर बच्चू कडू म्हणाले, एकनाथ शिंदेंना कोण काय म्हणतंय याकडे लक्ष देत नाहीत. कारण त्यांना रिक्षावाला वगैरे म्हणणं देखील वाईट वाटणार नाही. शिंदे किंतू परंतू न ठेवता प्रेम करणारा माणूस आहे. आम्ही सुद्धा शेतकरी, दूध वाटप करणारे आहोत. कोणतंही काम वाईट नसतं. तुम्ही सर्वसामान्य जनतेचं प्रतिनिधीत्व करत असता आणि हे सरकार सर्वसामान्य जनतेचं आहे, असे बच्चू कडू म्हणाले आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
301,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा