29 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरराजकारणपाटणकर प्रकरणातल्या पुष्पक बुलियनने नोटाबंदीत केली २८५ किलो सोने खरेदी

पाटणकर प्रकरणातल्या पुष्पक बुलियनने नोटाबंदीत केली २८५ किलो सोने खरेदी

Google News Follow

Related

ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या ११ सदनिका जप्त केल्यानंतर त्यासंदर्भातील डोळे विस्फारणारी आकडेवारी समोर येऊ लागली आहे. या प्रकरणातील पुष्पक बुलियनने नोटाबंदीच्या काळात २८५ किलो सोने खरेदी केले होते. त्याचा पर्दाफाश किरीट सोमय्या यांनी केला आहे.

ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई केली. ईडीने त्यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीवर मंगळवारी कारवाई केली़. या कंपनीच्या मालकीच्या ठाण्यातील निलांबरी प्रकल्पातील ११ सदनिकांवर ‘ईडी’ने जप्ती आणली असून, ही मालमत्ता ६ कोटी ४५ लाखांची आहे.

या प्रकरणानंतर ईडीने कारवाई केलेल्या कंपन्यांची आणि व्यक्तींची नावे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उघड केली आहेत. नीलांबरी प्रकल्प ठाणे, श्री साईबाबा गृहनिर्माण प्रा. लि, श्रीधर माधव पाटणकर, पुष्पक बुलियन, महेश पटेल, चंद्रकांत पटेल, पुष्पक रियालिटी डेव्हलपर, नंदकिशोर चतुर्वेदी आणि हमसफर डीलर प्रा. लि. अशी नावे समोर आली आहेत.

पुष्पक बुलियन प्रकरणात ‘ईडी’ने ही कारवाई केली आह़े. याआधी ‘ईडी’ने ६ मार्च २०१७ रोजी पुष्पक बुलियन व समूह कंपन्यांविरोधात गुन्हा नोंदवला होता. याप्रकरणी ‘ईडी’ने पुष्पक बुलियनच्या २१ कोटी ४६ लाख रुपये किमतीच्या मालमत्तांवर टाच आणली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान श्रीधर पाटणकर यांच्या मालकीच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. या कंपनीशी ३० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा व्यवहार झाल्याचे ‘ईडी’च्या निदर्शनास आले. त्यानंतर या कंपनीच्या मालकीच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली.

पुष्पक समूह महेश पटेल, चंद्रकांत पटेल आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा आहे. पुष्पक रियल्टीमध्ये गुंतवलेली रक्कम महेश पटेल यांनी नंदकिशोर चतुर्वेदीच्या माध्यमातून काढून घेतल्याचे या प्रकरणाच्या तपासादरम्यान उघडकीस आले. पुष्पक रियल्टी डेव्हलपरने विक्रीच्या नावाखाली २० कोटी दोन लाख रुपये नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या संस्थांना दिले.

अनेक बनावट कंपन्या चालवणाऱ्या नंदकिशोर चतुर्वेदी यांनी पुढे हमसफर डीलर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. या कंपनीला ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम विनातारण कर्जस्वरूपात दिली. अशा पद्धतीने गैरव्यवहारातील रकमेचा श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीच्या गृहप्रकल्पात वापर झाल्याचे ‘ईडी’कडून सांगण्यात आले.

दरम्यान उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांनी २०१४ साली कोमो स्टॉक प्रॉपर्टीज कंपनी तयार केली. ती कंपनी २०१९ मध्ये हवाल किंग नंदकिशोर चतुर्वेदीच्या मालकीची झाली आहे. याच कंपनीतून ३० कोटी रुपये श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीत वळवले गेले, असा दावा किरीट सोमय्या यांनी काही कागदपत्रे दाखवत केला.

हे ही वाचा:

तृणमूल नेत्याच्या हत्येनंतर प. बंगालमध्ये १० जणांना जिवंत जाळलं 

‘उ. प्रदेशमधील पराभवासाठी प्रियांका गांधींचा राजीनामा घ्या’

‘राष्ट्रीय महामार्गांवर ६० किलोमीटरच्या अंतरात एकच टोल असेल’

‘पाटणकर यांच्याशी झालेल्या व्यवहाराबद्दल मुख्यमंत्री बोलणार का?’

नोटाबंदीच्या काळात २८५ किलो सोन्याची खरेदी केल्याप्रकरणी ईडीने २०१७ मध्ये पुष्पक बुलियनविरोधात गुन्हा नोंदवला होता. पुष्पक बुलियन्स प्रा. लिमिटेड कंपनीचे चंद्रकांत पटेल यांनी नोव्हेंबर- डिसेंबर २०१६ या नोटाबंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले होते. त्याची किंमत ८४ कोटी रुपयांच्या आसपास आहे. या प्रकरणाच्या तपासात पीहू गोल्ड आणि साटम ज्वेलर्स यांच्या खात्यामध्ये ४१ दिवसांत मोठ्या प्रमाणात रक्कम जमा केल्याचे उघड झाले होते. पुष्पक बुलियन्सचे खाते बँकेने ‘नॉन प्रॉफिट असेट्स’ म्हणून जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर या खात्यातून व्यवहार झाल्याचा आरोप आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा