31 C
Mumbai
Saturday, October 3, 2026
घरराजकारणराहुल गांधींकडून कन्हैय्याकुमारची चंपी

राहुल गांधींकडून कन्हैय्याकुमारची चंपी

दिल्ली विद्यापीठात पराभव का झाला?

Google News Follow

Related

दिल्ली विद्यापीठात झालेल्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर अस्वस्थ झालेल्या राहुल गांधी यांनी या निवडणुकीची जबाबदारी स्वीकारलेल्या कन्हैय्याकुमारला जाब विचारला आहे.

काँग्रेससाठी दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेची (DUSU) निवडणूक ही केवळ आणखी एक विद्यार्थी निवडणूक नव्हती. तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या पक्षाच्या प्रयत्नांची ही परीक्षा म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात होते. मात्र, काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयुआयलाचार सदस्यीय केंद्रीय पॅनेलमधील एकही पद जिंकता आले नाही.

या धक्कादायक निकालानंतर काही आठवड्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या पराभवाबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.

राहुल गांधी यांनी सोमवारी एनएसयुआयचे प्रभारी कन्हैया कुमार आणि राष्ट्रीय अध्यक्ष विनोद जाखड यांना बैठकीसाठी बोलावले. या बैठकीत या निवडणुकीच्या निकालाचा आढावा घेण्यात आला. काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल हेही बैठकीला उपस्थित होते.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, एनएसयुआयची कामगिरी एवढी खराब का झाली, असा प्रश्न राहुल गांधी यांनी दोन्ही नेत्यांना विचारला. विशेष म्हणजे, एनएसयुआय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयाच्या अगदी जवळ असल्याचे सांगितले जात असतानाही अखेरीस संघटनेला एकही पद मिळाले नाही, याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

“आम्ही अध्यक्षपद जिंकण्याच्या अगदी जवळ होतो, मग असे काय झाले?” असा प्रश्न राहुल गांधी यांनी बैठकीत विचारल्याचे समजते.

हे ही वाचा:

एक दिवसाआड झालेल्या पत्रकार परिषदांचा अजब योगायोग!

तृणमूलचे इंद्रनील सेन यांच्या घरावर ईडीची धाड

उज्जैनमधील मशिदीच्या वादात एआय व्हिडीओने पेटवली अफवांची ठिणगी

सचिननंतर विराटची १५ हजारी झेप!

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी निवडणूक व्यवस्थापनाबाबत कन्हैया कुमार आणि विनोद जाखड यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच निवडणुकीची रणनीती, उमेदवारांची निवड आणि प्रचाराचे नियोजन याबाबत सविस्तर स्पष्टीकरण मागितले.

काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनीही निकालाबाबत कन्हैया कुमार यांना प्रश्न विचारल्याचे समजते. उमेदवारांना तिकीट देण्याच्या प्रक्रियेदरम्यान कन्हैया कुमार यांनी उमेदवारांची जबाबदारी घेतली होती, याकडे वेणुगोपाल यांनी लक्ष वेधले. त्यामुळे अपेक्षेपेक्षा निकाल पूर्णपणे वेगळा का लागला, असा सवाल त्यांनी केला.

दीपांशू शोकीनच्या प्रकरणावरही प्रश्न

या बैठकीत दीपांशू शोकीन यांच्या प्रकरणावरही विशेष चर्चा झाल्याचे समजते. शोकीन हे एनएसयुआयचे माजी सदस्य असून त्यांनी उपाध्यक्षपदाची निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवली आणि विजय मिळवला.

शोकीन २०२३ पासून विद्यार्थी राजकारणात सक्रिय होते. त्यांनी २०२३ आणि २०२४ च्या निवडणुकांमध्ये प्रचारही केला होता.

त्यानंतर त्यांनी पुन्हा एनएसयुआयकडून निवडणूक लढवण्यासाठी पक्षाचे तिकीट मागितले. मात्र त्यांची निवड झाली नाही. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधी यांनी कन्हैया कुमार आणि विनोद जाखड यांना विशेषतः दीपांशू शोकीन यांना तिकीट का देण्यात आले नाही, असा प्रश्न विचारला.

यावर दोन्ही नेत्यांनी शोकीन यांनी ठेवलेल्या अटी अवाजवी असल्याचे राहुल गांधींना सांगितल्याचे समजते. मात्र, हे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळण्यात आले, त्याबाबत राहुल गांधी समाधानी नव्हते, असे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेस नेते अमिताभ दुबे यांनी शोकीन यांना तिकीट नाकारण्यात आल्याचा दावा फेटाळला आहे. एक्सवरील पोस्टमध्ये दुबे यांनी म्हटले की, शोकीन यांना अध्यक्षपदाचे तिकीट देण्यात आले होते; मात्र त्यांनी ते नाकारले आणि त्यानंतर उपाध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

ABVPचे तीन जागांवर यश

या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला (अभाविप) अध्यक्ष, सचिव आणि संयुक्त सचिव ही तीन प्रमुख पदे मिळाली, तर दीपांशू शोकीन यांनी उपाध्यक्षपद जिंकले. यामुळे एनएसयुआयला चार सदस्यीय केंद्रीय पॅनेलमध्ये एकाही पदावर विजय मिळवता आला नाही.

छात्रों की गूंजचे अपयश

काँग्रेसकडून गेल्या काही काळापासून तरुण मतदारांशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या संपर्क अभियानाच्या माध्यमातून विविध शहरांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला जात आहे.

त्यामुळे या निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसच्या संघटनात्मक पातळीवर काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. तरुणांपर्यंत व्यापक पातळीवर पोहोचण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांचे रूपांतर प्रत्यक्ष तळागाळातील संघटनात्मक ताकदीत होत आहे का, याबाबत पक्षांतर्गत चर्चा सुरू झाली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा