32 C
Mumbai
Friday, February 20, 2026
घरराजकारणराहुल गांधींचा जर्मनीतही वोटचोरीचा आरोप

राहुल गांधींचा जर्मनीतही वोटचोरीचा आरोप

Google News Follow

Related

काँग्रेस खासदार राहुल गांधी सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत आणि तिथेही त्यांनी भारतातील निवडणूक प्रक्रियेवरील अविश्वासाचा राग आळवला आहे. भारतात वोटचोरी झाल्याचा आरोप त्यांनी केला. आम्ही हिमाचल प्रदेश, तेलंगणाच्या निवडणुका जिंकल्या पण हरयाणात आम्ही जिंकलेलो असताना आम्हाला पराभूत करण्यात आले.

राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवताना, देशातील संस्थात्मक यंत्रणांचा राजकीय शस्त्र म्हणून वापर केला जात असल्याचा आरोप केला आहे. जर्मनीतील बर्लिन येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी दावा केला की, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) यांचा वापर भाजपकडून राजकीय विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी केला जात आहे, तर सत्ताधारी पक्षाशी जवळीक असलेल्यांना वाचवले जात आहे.

दरम्यान, भाजपने राहुल गांधींच्या या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया देत, त्यांना “भारतविरोधी” ठरवले असून त्यांच्या वागणुकीला बालिश असल्याची टीका केली आहे.

संस्थांवर थेट हल्ला

मागील आठवड्यात बर्लिनमधील हर्टी स्कूल येथे दिलेल्या भाषणात राहुल गांधी म्हणाले, आपल्या देशातील संस्थात्मक चौकटीवर संपूर्णपणे कब्जा करण्यात आला आहे. भारताच्या संस्थात्मक व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर हल्ला सुरू आहे. ते पुढे म्हणाले, “आपल्या गुप्तचर संस्था, ईडी आणि सीबीआय यांना शस्त्र बनवण्यात आले आहे. ईडी आणि सीबीआयकडे भाजपविरोधात एकही प्रकरण नाही, तर बहुतेक सर्व राजकीय प्रकरणे भाजपला विरोध करणाऱ्यांविरोधात आहेत.”

काँग्रेस समर्थक व्यावसायिकांना धमक्या?

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, जे गेल्या आठवड्यात पाच दिवसांच्या जर्मनी दौऱ्यावर होते, त्यांनी असा आरोपही केला की, कोणताही उद्योगपती काँग्रेसला पाठिंबा देत असल्यास त्याला धमकावले जाते. त्यांच्या मते, भारतातील संस्था आता जशा कार्य करायला हव्यात तशा काम करत नाहीत.

ते म्हणाले, काँग्रेसने या संस्थात्मक चौकटी उभारण्यात मदत केली. आम्ही कधीही या संस्थांना ‘आमच्या’ नाही, तर ‘देशाच्या’ मानले. पण, भाजप या संस्थांकडे वेगळ्या नजरेने पाहतो. त्यांना या संस्था स्वतःच्या मालकीच्या वाटतात आणि त्या राजकीय सत्ता वाढवण्यासाठी वापरल्या जातात,” असा आरोप त्यांनी केला.

हे ही वाचा:

सनबर्न फेस्टिव्हलमध्ये मोबाईल चोरांचा धुमाकूळ

अल फलाह विद्यापीठाचा अल्पसंख्याक दर्जा रद्द होणार?

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक बळी घेणारा कीवी गोलंदाज ठरला जेकब डफी

न्यूझीलंडचा वेस्टइंडीजवर ३२३ धावांनी दणदणीत विजय, कसोटी मालिका २-० ने जिंकली

राहुल गांधी यांनी असेही म्हटले की, भारतामध्ये लोकशाहीवर हल्ला होत आहे आणि त्याला विरोध करणे गरजेचे आहे. आम्ही विरोधाची अशी व्यवस्था उभी करू जी यशस्वी ठरेल. आम्ही भाजपशी लढत नाही, तर भारतीय संस्थांवर त्यांनी केलेल्या कब्जाविरुद्ध लढत आहोत, असे ते म्हणाले.

राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मतांची चोरी झाल्याचा आरोप केला. त्यांनी दावा केला की, २०२४च्या हरियाणा विधानसभा निवडणुकांत भाजपाला विजय मिळवून देण्यात आला. ते म्हणाले, “आम्ही तेलंगणा, हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुका जिंकल्या आहेत. भारतातील निवडणुकांच्या पारदर्शकतेबाबत आम्ही सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहोत. आम्ही पत्रकार परिषदांमध्ये स्पष्ट पुरावे दाखवले की हरियाणामध्ये आम्ही निवडणूक जिंकलो होतो आणि महाराष्ट्रातील निवडणुका न्याय्य वाटत नाहीत.”

त्यांनी आरोप केला की, मतदार यादीत दुबार नोंदीसारख्या अनियमिततेबाबत निवडणूक आयोगाकडे प्रश्न विचारूनही कोणतेही उत्तर मिळाले नाही. भारतातील निवडणूक यंत्रणेमध्ये मूलभूत समस्या आहे, असा आमचा ठाम विश्वास आहे,  असेही त्यांनी नमूद केले.

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक धोरणावरही टीका केली. त्यांच्या मते, भाजप आणि RSS यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या धोरणांनाच पुढे नेले असून, कोणतीही नवी दिशा दिलेली नाही.

त्यांनी दावा केला की, मोदी सरकारचे आर्थिक मॉडेल आता अपयशाच्या टप्प्यावर आले आहे आणि ते पुढे परिणाम देऊ शकत नाही. मोदींना अनेक लोकांचा पाठिंबा असल्याचे मान्य करत असतानाही, मोठा वर्ग त्यांच्या विचारसरणीशी सहमत नसल्याचे गांधी म्हणाले.

“आम्हाला वाटते ही विचारसरणी अपयशी ठरेल. ती भारतात मोठे सामाजिक तणाव निर्माण करेल आणि लोकांना एकमेकांविरुद्ध उभे करेल. हा भारतातील दोन दृष्टिकोनांमधील संघर्ष आहे,” असे ते म्हणाले.

भाजपचा तीव्र प्रतिहल्ला

मंगळवारी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, जो खरोखर भारतावर प्रेम करतो, तो देश अपयशी व्हावा अशी इच्छा करेल का? X वर पोस्ट करताना भंडारी यांनी आरोप केला की, राहुल गांधी आणि त्यांचे “वैचारिक मार्गदर्शक जॉर्ज सोरोस” भारतीय लोकशाहीमध्ये अराजकता आणि अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि परदेशात जाऊन “भारतविरोधी शक्तींना एकत्र करत आहेत”.

ते पुढे म्हणाले की, काँग्रेस भारताच्या प्रगतीला आणि लोकशाहीला विरोध करते आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली पक्ष अराजकतेला प्रोत्साहन देतो. भाजप नेत्या शोभा करंदलाजे यांनीही राहुल गांधींवर टीका करत, “तो परदेशात जाऊन भारताविरोधात बोलणारा नेता आहे. त्याला यातून नेमकं काय साध्य करायचं आहे? तो अजूनही नेत्यासारखा नाही, तर लहान मुलासारखा वागतो,” असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
294,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा