30 C
Mumbai
Monday, December 8, 2025
घरराजकारण'आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका!' राज ठाकरेंचा लेटरबॉम्ब

‘आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका!’ राज ठाकरेंचा लेटरबॉम्ब

Google News Follow

Related

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिले आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असा घणाघात राज ठाकरे यांनी या पत्रातून केला आहे. ‘सत्ता येत- जात असते.
कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही.’ असा सणसणीत हल्ला या पत्रातून करण्यात आला आहे.

राज ठाकरेंच्या पत्रातील मजकूर

प्रति,

श्री. उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

सस्नेह जय महाराष्ट्र!

सर्व देशबांधवांना मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे. देशाचे सर्वोच्च न्यायालय आणि विविध राज्यातील उच्च न्यायालयं यांनी दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी यासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दि. ४ मे रोजी “भोंगे उतरवा’ आंदोलन सुरू करण्यापूर्वीच ठिकठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आली. तब्बल २८ हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या, हजारोंना तडीपार केलं आणि अनेकांना तुरुंगात डांबलं. कशासाठी? ध्वनिप्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी!

गेला आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे ते पाहता मला प्रश्न पडलाय की; मशिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी ‘धरपकड मोहीम’ राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का? आमचा संदीप देशपांडे आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलीस असे काही शोधत आहेत, जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैद्राबाद संस्थानातले ‘रझाकार’ आहेत! अर्थात, महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत.

राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे; आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!

आपला नम्र,
राज ठाकरे

हे ही वाचा:

संगीताचा ‘अंतर्ध्वनी’ टिपणारा संगीतपूजक

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपींसाठी पुन्हा सरसावले शरद पवार

नाना पटोलेही करणार अयोध्या वारी

राज ठाकरे माफी मांगो, उत्तर प्रदेशात शक्तीप्रदर्शन

त्यामुळे गेले काही दिवस हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात सुरु असलेला शिवसेना विरुद्ध मनसेचा कलगीतुरा आता अधिकच तीव्र होण्याची चिन्हे आहेत. राज ठाकरे यांच्या या लेटरबॉम्ब नंतर आता उद्धव ठाकरे आणि शिवसेनेकडून याला काय प्रत्युत्तर येणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर मनसेच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात सुरु असलेली कारवाई अधिक तीव्र होणार का? याकडेही साऱ्यांचे लक्ष असणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा