29 C
Mumbai
Thursday, May 19, 2022
घरराजकारणकोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपींसाठी पुन्हा सरसावले शरद पवार

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपींसाठी पुन्हा सरसावले शरद पवार

Related

कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर घुमजाव करणारे शरद पवार यांनी पुन्हा एकदा हिंचाचार प्रकरणातील आरोपींची वकिली करण्याचा प्रयत्न केला आहे. मंगळवार, १० मे रोजी पत्रकारांशी संवाद साधताना पवारांनी पुन्हा एकदा या खटला संदर्भात भाष्य केले आहे. कोरेगाव भीमा खटल्यात राजद्रोहाच्या कलमाचा गैरवापर केल्याचे पुन्हा एकदा शरद पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवार यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर साक्ष देताना शरद पवार यांनी आपल्याला या प्रकरणातील माहिती नसल्याचे म्हटले होते. या प्रकरणात आपला कोणावरही संशय किंवा आरोप नसल्याची साक्ष पवार यांनी दिली होती. पण त्या वेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात शरद पवार यांनी राजद्रोहाच्या कलमावर निशाणा साधला होता.

हे ही वाचा:

नाना पटोलेही करणार अयोध्या वारी

‘उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांची ट्युशन घ्यावी’

योगी सरकार देणार,अयोध्येतील चौकाला लता मंगेशकरांचे नाव

शिवसेनेची लिलावतीत दादागिरी; नर्सेस, डॉक्टर, वॉर्ड बॉयना धमकावले

या प्रकरणात आरोपींवर लावण्यात आलेल्या राजद्रोहाच्या कलमाचा पुनर्विचार व्हावा असे पवार यांनी म्हटले होते. कायद्यात असलेले राजद्रोहाचे कलम हे इंग्रजांच्या काळातील कलम असल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते. त्यामुळे आजच्या परिस्थितीत ते कलम तितकेसे योग्य वाटत नाही. त्यामुळे त्याचा पुनर्विचार व्हावा असे पवारांनी म्हटले होते.

याचाच पुनरुच्चार पुन्हा एकदा शरद पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला. कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या प्रकरणात तपास यंत्रणांनी राजद्रोहाचा कलम चुकीच्या पद्धतीने लावल्यात आले असून या कालमाचा गैरवापर केल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता शरद पवार यांच्या अडचणी वाढणार का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,973चाहतेआवड दर्शवा
1,889अनुयायीअनुकरण करा
9,340सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा