28 C
Mumbai
Sunday, September 27, 2026
घरराजकारण'कॉक्रोच'नंतर आता ज्ञानेशकुमारांविरुद्ध राज-उद्धवही काढणार मोर्चा

‘कॉक्रोच’नंतर आता ज्ञानेशकुमारांविरुद्ध राज-उद्धवही काढणार मोर्चा

४ ऑक्टोबरला करणार विरोध

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

कॉक्रोच जनता पार्टीने निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात २ ऑक्टोबरला मुंबईतून मोर्चा काढण्याची घोषणा केलेली असताना आता महाराष्ट्रातून राज आणि उद्धव ठाकरे यांनीही त्यानंतर दोन दिवसांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

राज ठाकरेंनी तशी पोस्ट टाकत या मोर्चाविषयी माहिती दिली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, देशातील सत्ताधारी पक्षाची जणू काही आपण शाखाच आहोत अशा पद्धतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’च्या नावाखाली मतदारांची जी घोर फसवणूक केली आहे त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना येत्या ४ ऑक्टोबर २०२६ ला मुंबईत एक जनमोर्चा काढणार आहे. या मोर्चाच्या आयोजनात जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा पुढाकार असला तरी हा जनतेचा मोर्चा आहे आणि हा एका पक्षापुरता न राहता तो तमाम राजकीय व्यवस्थेचा आणि जनतेचा आवाज ठरेल यासाठी आम्ही सर्व राजकीय पक्षांना या मोर्चा मध्ये सहभागी होण्यासाठी संवाद साधणार आहोत.

हे ही वाचा:

नागालँडमध्ये बनावट दारूच्या सेवनानंतर १९ जण दगावले

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर

इराणचा शांततेचा प्रस्ताव ट्रम्पनी धुडकावला

दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?

या मोर्चाचे ठिकाण आणि वेळ अद्याप कळविलेले नाही. देशाचे संविधान वाचविण्यासाठी, लोकशाही वाचविण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे.

कॉक्रोच जनता पार्टीने जंतर मंतर येथे आंदोलन केल्यानंतर त्या ठिकाणी मनसेचे युवा नेते अमित ठाकरे अभिजित दिपकेची भेट घेण्यासाठी गेले होते. तर उद्धव ठाकरे यांनीही दिल्लीत धाव घेतली होती. मुंबईतही त्यावेळी ठाकरे बंधूंनी शिवाजी पार्कमध्ये मेळावा घेत कॉक्रोचचे अभिनंदन केले होते. आदित्य ठाकरेनी होय आम्ही कॉक्रोच आहोत, असेही म्हटले होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा