31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
घरराजकारणपंतप्रधानांची रक्षाबंधन भेट; गॅसच्या किमती २०० रुपयांनी घटल्या

पंतप्रधानांची रक्षाबंधन भेट; गॅसच्या किमती २०० रुपयांनी घटल्या

देशातील ७५ लाख बहिणींना दिली भेट

Google News Follow

Related

रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील तमाम भगिनींना एक अनोखी भेट दिली आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात २०० रुपयांनी घट करण्यात आली असून त्याचा फायदा भारतातील लाखो महिलांना होणार आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती मंगळवारी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली. १४.२ किलोच्या गॅसच्या किमतीत १८ टक्के घट करण्यात आली आहे.

 

ठाकूर म्हणाले की, उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत ७५ लाख नव्या गॅस जोडण्या मोफत देण्यात येणार आहेत. ओणम आणि रक्षाबंधनाच्या या सणांच्या निमित्ताने सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की, पंतप्रधानांनी महिलांना मोठी भेट दिली आहे.
अनुराग ठाकूर म्हणाले की, प्रत्येक घरातील घरगुती गॅसच्या किमतीत २०० रुपयांनी घट करण्यात आली आहे.
सध्या महागाईचा मुद्दा तापलेला असताना मोदी सरकारने हा निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा दिला आहे. कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना या निर्णयामुळे अधिक दिलासा मिळणार आहे.

या निर्णयामुळे भारत सरकारवर ४००० कोटींचा बोजा पडणार आहे. सध्याच्या आर्थिक वर्षासाठी ७६०० कोटींचे अंदाजपत्रक आखण्यात आले होते. त्यावर हा अतिरिक्त भार पडेल.
दिल्लीत या गॅसच्या एका सिलिंडरची किंमत ११०३ रुपये असून मुंबईत ती ११०२.५० आहे. ही किंमत आता अनुक्रमे ९०३ आणि ९०२.५० होणार आहे.

 

यात आणखी फायदा होणार आहे तो उज्ज्वला योजनेतील ग्राहकांना. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती २०० रुपयांनी कमी झालेल्या आहेतच पण जी कुटुंबे उज्ज्वला योजनेत येतात त्यांना आणखी २०० रुपयांचा फायदा मिळेल. त्यामुळे त्यांच्या सिलिंडरच्या किमतीत ४०० रुपयांची घट होईल. याचा अर्थ दिल्लीत उज्ज्वला योजनेतून गॅस सिलिंडर घेणाऱ्यांना तोच गॅस ७०३ रुपयांत तर मुंबईत तो ७०२.५० रुपयांत पडेल.

हे ही वाचा:

किशोरी पेडणेकरांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम

मद्य धोरण योजेनातील आरोपीकडून लाच घेणाऱ्या ईडी अधिकाऱ्याला अटक

मुंबईच्या वाहतूक कोंडीवर वॉर रूममध्ये खलबते!

…अन् तान्हुलीला विमानातच भेटले देवदूत

अनुराग ठाकूर यासंदर्भात म्हणाले की, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना लाभार्थ्यांना आधीच २०० रुपयांची सवलत मिळत होती त्यात आता ही आणखी २०० रुपयांची सवलत मिळणार असल्यामुळे त्यांच्या एकूण किमतीत ४०० रुपयांची घट होईल.
ठाकूर यांनी सांगितले की, २०१४पासून पंतप्रधानांनी महिलांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने निर्णय घेतलेले आहेत. उज्ज्वला योजनेचा लाभ ९.६ कोटी महिला घेत आहेत.

 

२०१६मध्ये उज्ज्वला योजना सुरू झाली. सरकारने समाजकल्याणाच्या हेतून तयार केलेली ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील महिलांना अन्न शिजविण्यासाठी गॅस स्वस्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी ही योजना तयार करण्यात आली. लाकूड, कोळसा यांच्या ज्वलनातून होणारे प्रदूषण आणि त्यातून गृहिणींना होणाऱ्या त्रासातून मुक्ती देण्यासाठी ही योजना राबविण्यात आली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
206,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा