31 C
Mumbai
Friday, May 13, 2022
घरराजकारणउद्धव ठाकरेंना हिंदुत्व रोज सिद्ध करावं लागतं, बाळासाहेबांवर कधी ही वेळ आली...

उद्धव ठाकरेंना हिंदुत्व रोज सिद्ध करावं लागतं, बाळासाहेबांवर कधी ही वेळ आली नव्हती

Related

शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व सोडल्याचा असा अनेक नेत्यांनी शिवसेनेवर आरोप केला आहे. आज, १० एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री राव साहेब दानवे यांनी शिवसेनवर निशाणा साधला आहे. शिवसेनेला त्यांचं हिंदुत्व सिद्ध करावं लागत आहे, त्यामुळे शिवसेनेचं हिंदुत्व बेगडी असल्याचा आरोप राव साहेब दानवे यांनी शिवसेनेवर केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानसभेत आम्ही हिंदुत्व असल्याचे सांगत आहेत. याआधी बाळासाहेब ठाकरेंना कधी हे सांगायची वेळ आली नाही. बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट म्हणतात, त्यांना कधी हिंदुत्व सिद्ध करावं लागलं नाही. मात्र आताच्या ठाकरे सरकारला हे करावं लागतंय कारण त्यांचं हिंदुत्व बेगडी आहे. स्वतःच्या तोंडून जेव्हा विधानसभेत आणि लोकांना हिंदुत्व सोडलं नसल्याचे सांगावे लागत आहे,याचा लोकांच्या मनात यांनी हिंदुत्व सोडलं असल्याची भावना आहे. सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, ही शिवसेनेने सत्तेसाठी केलेली लाचारी आहे, अशी टीका राव साहेब दानवे यांनी शिवसेनेवर केली आहे.

दरम्यान, गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींच कौतुक केलं असताना राज ठाकरेंवर मविआने टीका केली होती. त्यामुळे, ‘राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींच कौतुक केलं तर मविआच्या पोटात का दुखलं,’ असा सवाल दानवे यांनी केला आहे.

हे ही वाचा:

हिमाचलमध्ये आप ला धक्का, प्रदेशाध्यक्षांसह तीन बडे नेते भाजपात

मनसेने थेट शिवसेना भवनाबाहेर लावली हनुमान चालीसा

अखेर इम्रान खान क्लिन बोल्ड; पंतप्रधानपद गमावले

‘श्रीरामांच्या आचार-विचारांचा जीवनात सर्वांनी अंगीकार करायला हवा’

गुढीपाडवा मेळाव्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यांनतर काल मंत्री राव साहेब दानवे आणि भाजपा नेत्या शायना एन.सी यांनीदेखील राज ठाकरेंची भेट घेतली होती. राज ठाकरेंनी भाषणात शिवसेनेची भूमिका घेतल्याने अनेक भाजपा नेत्यांनी त्यांचे कौतुक केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,979चाहतेआवड दर्शवा
1,884अनुयायीअनुकरण करा
9,200सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा