29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरराजकारणअमोल कोल्हेंबाबत शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात मतभेद

अमोल कोल्हेंबाबत शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात मतभेद

Google News Follow

Related

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात केलेल्या नथुरामाच्या भूमिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच परस्परविरोधी मते समोर येऊ लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी कलाकार म्हणून कोल्हे यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे पण राष्ट्रवादीचेच नेते व मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मात्र या भूमिकेला विरोध केला असून हा चित्रपट प्रदर्शित करण्यासही विरोध केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतच कोल्हे यांच्या भूमिकेबद्दल मतभेद असल्याचे स्पष्ट होत आहे.

अमोल कोल्हे यांचा हा चित्रपट ३० जानेवारीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. त्यामुळे या वादाला तोंड फुटले आहे. कोल्हे यांनी २०१७मध्ये या चित्रपटात ही भूमिका केली होती. तेव्हा ते राष्ट्रवादीत नव्हते.

जितेंद्र आव्हाड यासंदर्भात म्हणाले की, २०१७, २०१४ की १९४७ आहे हे महत्त्वाचे नाही. २०१७ ला तुमच्या विचारात काय होते आणि २०२२ला विचारात काय होते या वेगळ्या गोष्टी आहेत. एखादी भूमिका स्वीकारताना त्या भूमिकेत आपण उतरत असतो, हे प्रत्येक कलाकाराने लक्षात ठेवावे.

शरद पवार यांनी मात्र कोल्हे यांना कलाकार म्हणून पाठिंबा दिला आहे. अफझलखान, रावण यांच्या भूमिका करणारा कलाकार त्या व्यक्तीचे समर्थन करत नसतो तर केवळ कलाकार म्हणून तो ती भूमिका साकारत असतो. त्यामुळे कोल्हे यांनी केलेल्या भूमिकेला आपले समर्थन आहे.

याबाबत स्वतः कोल्हे म्हणाले की, काही भूमिकांशी तुम्ही वैचारिकदृष्ट्या सहमत असता ती करता, एखाद्या भूमिकेशी तुम्ही सहमत नसता पण ती आव्हानात्मक असते. गँगस्टरची भूमिका करायची म्हणजे तुम्ही त्याच्याशी समरूप असले पाहिजे असे काही नाही. नथुरामची भूमिका आली ती मी केली. गेली १२-१४ वर्षे मी अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. मी यापूर्वी कधीही गांधीच्या हत्येचे समर्थन केले नाही. नथुराम यांचेही उदात्तीकरण केले नाही.

यासंदर्भात शरद पवार यांची परवानगी घेतली होती का या प्रश्नावर कोल्हे म्हणाले की, मी तेव्हा सक्रीय राजकारणात नव्हतो. मतदारसंघाचे प्रतिनिधित्वही करत नव्हतो. एक भूमिका साकारताना त्याचा राजकीय विचारांशी संबंध जोडला जाऊ नये. या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत.

हे ही वाचा:

ज्येष्ठ पत्रकार, संपादक दिनकर रायकर यांचं निधन

पणजीतून शिवसेनेने उमेदवार दिला पण उत्पल पर्रीकर लढत असतील तर…

स्वतःच्या सुनेला अधिकार न देणारे तौकीर महिलांना काय न्याय देणार?

लाखभर रुपये घेऊन विकत होते प्रमाणपत्र; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

 

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे की, कोल्हे शिवाजी महाराजांची भूमिका करत असताना ते आपण ही भूमिका जगत असल्याचे म्हणत होते. मग नथुरामाच्या भूमिकेला न्याय देताना ते तेच करणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही कोल्हे यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान केला आहे. त्यांच्या या भूमिकेकडे अभिनय आणि कलेच्या दृष्टिकोनातून पाहायला हवे, असे ते म्हणतात. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांची भूमिका मात्र विरोधी आहे. ते म्हणाले की, ते एका पक्षात खासदार म्हणून काम करतात. त्यावेळी त्यांची भूमिका राष्ट्रवादीशी संलग्न असली पाहिजे. महात्मा गांधी यांचा वध ज्यांनी केला त्याची भूमिका करणे योग्य नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा