29 C
Mumbai
Friday, October 9, 2026
घरराजकारणमुस्लिमांचे मतदारसंघ असलेल्या नंदीग्राम, रेजीनगरमध्ये भाजपाचा डंका

मुस्लिमांचे मतदारसंघ असलेल्या नंदीग्राम, रेजीनगरमध्ये भाजपाचा डंका

पश्चिम बंगाल पोटनिवडणुकीत मिळविले दणदणीत यश

Google News Follow

Related

पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आपली ताकद दाखवत शुक्रवार, ९ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत नंदीग्राम आणि रेजीनगर या दोन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. या दोन्ही मतदारसंघांमध्ये ६ ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील नंदीग्राम मतदारसंघात भाजपच्या उमेदवार हसी राणी रथ यांनी एक लाख २२ हजारांहून अधिक मतांच्या विक्रमी फरकाने विजय मिळवला. तर मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रेजीनगर मतदारसंघात भाजपचे उमेदवार शंकरराव सरकार यांनी ७५ हजारांहून अधिक मतांनी विजय नोंदवला.

पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी पक्षाने पोटनिवडणुका जिंकण्याची परंपरा यापूर्वीही पाहायला मिळाली आहे. मात्र, या निकालांचे विशेष महत्त्व असल्याचे मानले जात आहे. कारण नंदीग्राम आणि रेजीनगर या दोन्ही मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदारांची मोठी संख्या असतानाही भाजपला लक्षणीय पाठिंबा मिळाल्याचा दावा मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी केला आहे. रेजीनगरमध्ये सुमारे ७० टक्के मतदार अल्पसंख्याक समुदायातील आहेत, तर नंदीग्राममध्ये मुस्लिम मतदारांचे प्रमाण सुमारे २७ टक्के आहे.

या विजयामुळे पश्चिम बंगाल विधानसभेतील भाजपच्या आमदारांची संख्या वाढून २०९ झाली आहे. राज्य विधानसभेत एकूण २९४ जागा आहेत.

हे ही वाचा:

शेअर बाजाराचं जोरदार कमबॅक

स्मृतीने स्वतःची नेतृत्वशैली घडवावी!

गोदावरी नदीकाठावरील अनधिकृत मजार हटवली

फेसबुकवरील कमेंटमुळे श्रीलंकन हिंदू तरुणाला सौदीत मृत्युदंड

रेजीनगर हा हुमायूँ कबीर यांचा मतदारसंघ. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीआधी बाबरी मशिद बांधण्याचा संकल्प सोडणारे हुमायूँ कबीर होते. ते तिथून विजयीही झाले. ते दोन ठिकाणी जिंकले होते. हा मतदारसंघ त्यांनी आपला मुलगा गुलाम नबी आझादसाठी सोडला. पण त्यांच्या मुलाला पराभव पत्करावा लागला. निवडणूक प्रचारादरम्यान आपण आता राजकारणापासून दूर जाणार असल्याचे हुमायूँ कबीर म्हणत होते. भाजपाचाच इथे विजय होईल, असे भाकीत स्वतः त्यांनीच केले होते.

शुभेंदूंनी मुस्लिमांचे मानले आभार

मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी पोटनिवडणुकीदरम्यान मुस्लिम मतदारांना भाजपच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले होते. निकालानंतर त्यांनी नंदीग्राम आणि रेजीनगरमधील अल्पसंख्याक मतदारांचे आभार मानले. नंदीग्राममध्ये ८० टक्के मुस्लिम मतदारांनी भाजपला पाठिंबा दिला, तर रेजीनगरमध्ये ६० टक्क्यांहून अधिक मुस्लिम मतदारांनी भाजपला मतदान केल्याचा दावा त्यांनी केला.

राज्य सचिवालयात पत्रकारांशी बोलताना अधिकारी म्हणाले, “मुस्लिम मतदारांनी आम्हाला मतदान केले, कारण त्यांना सरकारच्या पाठीशी उभे राहायचे आहे. मुस्लिमांना नजरकैद केंद्रांमध्ये ठेवले जाईल आणि त्यांना त्यांच्या धर्माचे पालन करू दिले जाणार नाही, असे सांगण्यात आले होते. मात्र, गेल्या पाच महिन्यांत हे सर्व दावे खोटे ठरले आहेत. त्यामुळेच मुस्लिम मतदारांनी आम्हाला मतदान केले.”

नंदीग्राममध्ये काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांनी सुमारे ४६ हजार मते मिळवत दुसरे स्थान मिळवले. रेजीनगरमध्ये आम जनता उन्नयन पार्टीचे (एजेयूपी) उमेदवार गोलाम नबी आझाद दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना सुमारे ४० हजार मते मिळाली.

नंदीग्राम आणि रेजीनगरमध्ये पोटनिवडणूक का झाली?

मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी भवानीपूर आणि नंदीग्राम या दोन्ही विधानसभा मतदारसंघांतून निवडणूक जिंकली होती. त्यानंतर त्यांनी भवानीपूरची जागा कायम ठेवण्याचा निर्णय घेत नंदीग्रामच्या आमदारपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे नंदीग्राममध्ये पोटनिवडणूक घेण्याची वेळ आली. दुसरीकडे, आम जनता उन्नयन पार्टीचे नेते हुमायून कबीर यांनी नौदा आणि रेजीनगर या दोन्ही मतदारसंघांतून विजय मिळवला होता. त्यांनी रेजीनगरच्या आमदारपदाचा राजीनामा दिल्यामुळे तेथेही पोटनिवडणूक घेण्यात आली.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा