30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरराजकारणनिवडणुकीच्या तोंडावर ठाकरे सरकारला आठवले वचन; ५०० स्क्वेअर फूटांपर्यंतच्या घरांना करमाफी

निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे सरकारला आठवले वचन; ५०० स्क्वेअर फूटांपर्यंतच्या घरांना करमाफी

Google News Follow

Related

आगामी मुंबई महापलिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारला त्यांनी दिलेल्या वचनांची आठवण आता दोन वर्षांनी होत असून या वचनांची पूर्तता करण्याचे प्रयत्न ठाकरे सरकारकडून सुरू आहेत. शनिवार १ जानेवारी रोजी नगरविकास खात्याची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला असून या बैठकीत ५०० स्क्वेअर फूटांपर्यंतच्या घरांना करमाफी करण्यात आली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात घोषणा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यादेखील या ऑनलाईन बैठकीत उपस्थित होत्या.

नव्या वर्षात मुंबईकरांसाठी दिलासादायक असा निर्णय घेत महाविकास आघाडी सरकारने मोठी घोषणा केली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा करत मुंबईतील ५०० स्क्वेअर फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यात आल्याचे सांगितले. शिवसेनेने आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मुंबईकरांसाठी ही घोषणा केली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेत या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव राज्यसरकारकडे पडून होता. त्यानंतर हा प्रस्ताव मंजूर होऊन एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली.

५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करात माफी दिल्यामुळे आता महापालिकेचा दरवर्षी ३४० कोटींचा कर बुडणार आहे. मुंबईमध्ये सुमारे १५ लाख घरे ही ५०० चौरस फुटांची आहेत. यामध्ये २८ लाख कुटुंब राहतात. कोरोना महामारीच्या काळात आणि आर्थिक चक्र बिघडलेले असताना सरकारकडून हा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे.

हे ही वाचा:

नवीन वर्ष महागाईचे की स्वस्ताईचे? वाचा सविस्तर

लहान मुलांच्या लसीकरण नोंदणीला आजपासून सुरुवात

जगाच्या पाठीवर भारताला नवी ओळख देणारे पंतप्रधान मोदी

जम्मू काश्मीरमध्ये वर्षभरात दीडशेहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा

या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी जनतेशी संवाद साधला. शस्त्रक्रिया झाल्यापासून उद्धव ठाकरे हे फारसे सक्रीय नव्हते. मात्र, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी जनतेशी संवाद साधला. मालमत्ता कर माफ करून वचन दिल्याप्रमाणे शब्द पाळला असल्याचे ते म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा