29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
घरराजकारणराज्यातील मंत्री, आमदार कोरोनाच्या विळख्यात

राज्यातील मंत्री, आमदार कोरोनाच्या विळख्यात

Google News Follow

Related

राज्य सरकारमधील काही मंत्री आणि आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंबंधी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे. ठाकरे सरकारमधील तब्बल १० मंत्री आणि २० आमदार यांना कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी ३१ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात ८ हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारपेक्षा ही रुग्णवाढ संख्या पन्नास टक्क्यांनी जास्त आहे.

भीमा कोरेगाव लढाईच्या विजयस्तंभाला आदरांजली वाहिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी राज्य सरकारमधील तब्बल १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले. त्याचवेळी त्यांनी कोरोनाच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी कोविड निर्बंधांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे, हे जनेतला समजून घेण्याची गरज आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता विधानसभेचे अधिवेशन केवळ पाच दिवसांचे करावे लागले. तरीही २० हून अधिक आमदार आणि सरकारच्या १० मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या लोकसभा खासदार सुप्रिया सुळे, राज्य मंत्र्यांपैकी वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, केसी पाडवी आणि आमदारांमध्ये राधाकृष्ण विखे पाटील, सागर मेघे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

लॉकडाऊनबाबत विचारणा केली असता अजित पवार म्हणाले की, लॉकडाऊन किंवा निर्बंधांबाबत मुख्यमंत्री स्तरावरील टास्क फोर्ससोबत यापूर्वीच बैठक झाली आहे. लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यायचा असेल तर दररोज संसर्गाचे प्रमाण किती वेगाने वाढत आहे हे पाहावे लागेल. जर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली तर हा प्रसार रोखण्यासाठी निर्बंधांबाबत आणखी कठोर निर्णय घेण्याची वेळ सरकारवर नकळत येईल. अशी परिस्थिती येऊ नये अशी माझी इच्छा आहे, असेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

गतवर्षी UPI द्वारे पन्नास लाखाहून अधिक कोटी रुपयांचे व्यवहार

नवीन वर्ष महागाईचे की स्वस्ताईचे? वाचा सविस्तर

नोव्हेंबर महिन्यात भारताने केली तिसऱ्या बॅलेस्टिक मिसाईल सबमरीनची यशस्वी चाचणी

कंगना रानौतला न्यायालयाचा धक्का!

दरम्यान, देशात गेल्या चोवीस तासांत २२ हजार ७७५ नवीन कोरोना प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर ४०६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने शनिवारी दिली. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक आढळून येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा