24 C
Mumbai
Thursday, February 22, 2024
घरराजकारणकेसीआर यांना धोबीपछाड देणाऱ्या काँग्रेसच्या रेवंथ रेड्डींनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

केसीआर यांना धोबीपछाड देणाऱ्या काँग्रेसच्या रेवंथ रेड्डींनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

सोहळ्याला सोनिया गांधींसह कॉंग्रेसच्या नेत्यांची हजेरी

Google News Follow

Related

काँग्रेसचे नेते रेवंथ रेड्डी यांनी तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची गुरुवार, ७ डिसेंबर रोजी शपथ घेतली. तेलंगणातील हैदराबाद येथील एलबी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या शपथविधी कार्यक्रमात काँग्रेस नेते रेवंथ रेड्डी यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. तेलंगणाचे राज्यपाल टी सुंदरराजन यांनी रेवंथ रेड्डी यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. तेलंगणाच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी शिवकुमार यांच्यासह अनेक काँग्रेस नेते उपस्थित होते.

रेवंथ रेड्डी तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री आहेत. २०१३ मध्ये तेलंगणाच्या स्थापनेनंतर काँग्रेस या राज्यात पहिल्यांदाच सत्तेत आली आहे. आतापर्यंत चंद्रशेखर राव (केसीआर) हे दोनवेळा मुख्यमंत्री झाले होते. मात्र, यावेळी रेवंथ रेड्डींनी चंद्रशेखर रावांना धोबीपछाड देत काँग्रेसकडे सत्ता खेचून आणली.

रेवंथ रेड्डी यांनी एलबी स्टेडियममध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळी या शपथविधी कार्यक्रमात सुमारे एक लाख लोक सहभागी झाले होते. शपथ घेण्यापूर्वी रेवंथ रेड्डी सोनिया गांधींसोबत खुल्या जीपमधून स्टेडियमवर पोहोचले. तेलंगणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवत ११९ पैकी ६४ जागा जिंकत बहुमत मिळवलं. तर बीआरएसला केवळ ३९ जागांवरच विजय मिळवता आल्या.

हे ही वाचा:

१०० कोटी रुपयांच्या विदेशी निधीप्रकरणात ८० मदरसे रडारवर

स्वानंद किरकिरे आणि ‘ऍनिमल’ टीममध्ये जुंपली!

तीन राज्यांत महिलाशक्ती? मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री महिला होण्याची शक्यता

लग्नात हुंडा मागितल्याने केरळच्या २६ वर्षीय महिला डॉक्टरची आत्महत्या!

रेवंथ रेड्डी यांचा प्रवास

रेवंत रेड्डी यांचा जन्म १९६९ मध्ये अविभाजित आंध्र प्रदेशातील महबूबनगर येथे झाला. रेड्डी यांनी विद्यार्थी राजकारणाची सुरुवात अभाविपपासून केली होती. नंतर त्यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षात प्रवेश केला. २००९ मध्ये ते टीडीपीच्या तिकिटावर आंध्रमधील कोडंगलमधून आमदार म्हणून निवडून आले. २०१४ मध्ये ते तेलंगणा विधानसभेत टीडीपीचे सभागृह नेते म्हणून निवडले गेले. पुढे त्यांनी २०१७ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०२१ मध्ये काँग्रेसने त्यांना मोठी जबाबदारी दिली आणि प्रदेशाध्यक्ष केलं. आता त्यांच्या पदरी मुख्यमंत्री पद आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
130,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा