26 C
Mumbai
Monday, January 26, 2026
घरराजकारणहिंदू नसतील तर जगच नष्ट होईल!

हिंदू नसतील तर जगच नष्ट होईल!

सरसंघचालक मोहन भागवत यांचे मणिपूरमध्ये वक्तव्य

Google News Follow

Related

“भारत ही एका अजरामर संस्कृतीचे नाव आहे. युनान (ग्रीस), मिस्र (ईजिप्त), रोमन साम्राज्य यांच्यासारख्या अनेक संस्कृती नष्ट झाल्या, पण भारताचे अस्तित्व टिकून राहिले. कारण आपल्या संस्कृतीत काहीतरी विशेष आहे, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मणिपूर येथे बोलताना हिंदू समाजाचे अस्तित्व आणि जागतिक संतुलन यांचे तौलनिक सूत्र मांडले. ते म्हणाले की, हिंदू नसतील तर जगच नष्ट होईल. जातीय संघर्षानंतर ते प्रथमच मणिपूरला भेट देत आहेत.

भागवत म्हणाले की, भागवत यांनी हिंदू समाजाला जागतिक ‘धर्मरक्षक’ म्हणत हा समाज अजरामर आहे, असे म्हटले. 
ते म्हणाले, “आपल्या समाजात असे परस्परबंध आपण निर्माण केले आहेत की, हिंदू समाज सदैव अस्तित्वात राहील. हिंदू संपले तर जगाचे अस्तित्वच संपेल.

याआधीही त्यांनी भारतातील मुस्लीम, ख्रिश्चन हेही एकाच पूर्वजांचे वंशज असल्याचे सांगितले होते आणि “भारतात कोणीही गैर-हिंदू नाही” असे मत व्यक्त केले होते.

हे ही वाचा:

मुर्शिदाबादला बाबरी मशीद बांधण्याचा तृणमूल आमदाराचा दावा

दक्षिण आफ्रिकेत पीएम मोदींची भारतीय वंशाच्या टेक उद्योजकांशी भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी जोहान्सबर्गमध्ये, भारतीय संस्कृतीचा प्रसार वाढवण्याचे आवाहन

घाटकोपरमध्ये भररस्त्यात रिटायर्ड लोको पायलटची हत्या

आर्थिक स्वावलंबनावर भर

भाजपची वैचारिक माता असलेल्या आरएसएस प्रमुखांनी देश बळकट करण्यासाठी स्वदेशी अर्थव्यवस्था आणि लष्करी व ज्ञान सामर्थ्य आवश्यक असल्याचे सांगितले.

भागवत म्हणाले, “राष्ट्र बांधण्यासाठी पहिले आवश्यक असते ते सामर्थ्य. आणि सामर्थ्य म्हणजे आर्थिक क्षमता. आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे स्वावलंबी हवी; कोणावरही अवलंबून राहू नये.” अमेरिकेने अर्थात डोनाल्ड ट्रम्प सरकारने भारतीय आयातीवर ५०% शुल्क लादल्यानंतर भारताच्या ‘स्वदेशी’ धोरणाला नवीन गती मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर भागवत यांनी हे भाष्य केले.

नक्षलवाद व ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्याची उदाहरणे

नक्षलवादावर प्रश्न उपस्थित करताना भागवत म्हणाले की, समाजानेच ठरवले म्हणून नक्षलवाद थांबला. “तो समाजानेच नाकारला” असे त्यांनी सांगितले. तसेच स्वातंत्र्यलढ्यातील ९० वर्षांच्या संघर्षाचे उदाहरण देत ते म्हणाले, “ब्रिटिश साम्राज्यावर सूर्य कधी मावळत नसे असे म्हटले जात होते. पण भारतात त्यांच्या साम्राज्याचा सूर्य आधीच मावळायला लागला होता. संघर्ष कधी कमकुवत झाला, कधी वाढला, मात्र आपण आपला आवाज कधीच दबू दिला नाही.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा