29 C
Mumbai
Friday, January 2, 2026
घरदेश दुनियापंतप्रधान मोदी स्वतःच्याच खिशातून करतात आपला वैद्यकीय खर्च

पंतप्रधान मोदी स्वतःच्याच खिशातून करतात आपला वैद्यकीय खर्च

माहिती अधिकारांत सिद्ध

Google News Follow

Related

पंतप्रधान “नरेंद्र मोदी”हे आपल्या उपचारांचा आणि वैद्यकीय खर्च स्वतःच उचलतात हे माहिती अधिकारांत सिद्ध झाले आहे. पुण्यातील माहिती अधिकारि कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी चौकशी केली असता पंतप्रधान कार्यालयाने २०१४ पासून भारत आणि परदेशात पंतप्रधानाच्या उपचार,आरोग्य तपासण्या आणि वैद्यकीय चाचण्यांवर जो खर्च होतो त्या पैशांची माहिती मागवली असता हि माहिती मिळाली.

कार्यालयाकडे उपलब्ध माहितीनुसार पंतप्रधानांनी त्यांच्या वैयक्तिक उपचारांवर कोणताही खर्च करण्यांत आलेला नसल्याचे कळते. असे कळते की, केंद्रीय मंत्री आणि संसद सदस्यांना वैद्यकीय सुविधांचा हक्क आहे. कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा म्हणाले की, पंतप्रधानांनी १३५ कोटी जनतेला फिट इंडिया चळवळीद्वारे तंदुरुस्त राहण्यासाठी प्रेरणा देऊन खुप मोठा संदेश दिला आहे.

फिट इंडिया चळवळ
पंतप्रधान मोदींनी २९ ऑगस्ट २०१९ रोजी फिट इंडिया चळवळ सुरु केली. तंदुरुस्ती हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, त्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
सारडा यांनी ट्विट केले की, माझ्या मागवलेल्या माहितीत अस म्हंटल आहे की, पंतप्रधान मोदींच्या वैद्यकीय खर्चासाठी गेल्या आठ वर्षात पीएमओने एक रुपयासुद्धा खर्च केला नाही,आपण आशा करूया की इतर खासदार आणि आमदारसुद्धा हिंदुस्थानच्या प्रधानसेवकाकडून काही शिकतील.

हे ही वाचा:

जयंत पाटीलही आता टोमणे मारून घालवत आहेत वेळ!

घुसखोर चीनला ‘तिरंगी हेल्मेट्स’ ची चपराक

समाजवादी पार्टीचा प्रवक्ता पत्रकारांच्या कुटुंबियांवरही आक्षेपार्ह टिप्पणी करत होता!

भूकंपाच्या धक्क्याने हिंगोली हादरले

 

पंतप्रधानांचे उत्पन्न
भारताच्या पंतप्रधानांना दरमहा सुमारे १ लाख ६० हजार रुपये मूळ वेतन मिळते, त्यांचे मूळ वेतन ५० हजार रुपये आहे आणि याशिवाय खर्च भत्ता ३००० रुपये आणि खासदार भत्ता ४५ हजार रुपये आहे. यासोबतच दैनंदिन २,००० रुपये म्हणजेच दरमहा ६१ हजार रुपये असून, हे सर्व मिळूनएक लाख  साठ हजार होतात.

२०१४ सालापासून पासून पंतप्रधानांना हा पगार मिळत आहे.अनेकवेळा विरोधक मोदींच्या कपड्यांवर टीका करतात याबद्दल कार्यालयाचे अधिकारी म्हणतात , मोदीजी त्यांच्या कपड्यांचा खर्च स्वतःच करतात. खरंतर पंतप्रधान पद भूषवणाऱ्या व्यक्तीचा सर्व खर्च हि केंद्र सरकारची जबाबदारी आहे पण मोदीजी आत्मनिर्भर आयुष्य जगण्यावर विश्वास ठेवतात.

 

 

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा