27 C
Mumbai
Saturday, December 6, 2025
घरक्राईमनामामुलुंडमध्ये ७० लाखांचा दरोडा घालणारे ७ जण गजाआड

मुलुंडमध्ये ७० लाखांचा दरोडा घालणारे ७ जण गजाआड

Google News Follow

Related

अंगाडियाच्या कार्यालयात दरोडा टाकून ७० लाख रुपयांची रोकड घेऊन पळून गेलेल्या आठ दरोडेखोरांपैकी ७ जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.

या आठ दरोडेखोरांनी मुलुंड येथून थेट नवी मुंबई गाठली आणि मोटारीतील प्रत्येकाची समान वाटणी केल्यानंतर प्रत्येकजण आपल्या वाटेने निघून गेले होते. पोलिसांनी दिवसरात्र मेहनत घेऊन ४८ तासात दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या ७ जणांकडून ३७ लाख रुपयाची रोकड आणि ६ पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहे.

या टोळीचा म्होरक्या हा उत्तर प्रदेश जोनपूर येथील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यूपीत अनेक गुन्हे दाखल आहेत.
मनोज काळे (३२), निलेश चव्हाण (३४),निलेश सुर्वे (२३),बिपिन कुमार राजेंद्र प्रसाद सिंग उर्फ मोनू  (३४),रत्नेश उर्फ अनिल कुमार सिंग (२५),दिलीप शिवशंकर सिंह(२३) आणि वशीउल्ला किताबुल्ला चौधरी (४०) असे अटक करण्यात आलेल्या ७ जणांची नावे आहेत. ठाणे, नवीमुंबई, रायगड, युपी, सुरत आणि डोंबिवली परिसरात राहणारे आहेत.

२ फेब्रुवारी रोजी दिवसाढवळ्या आठ जणांच्या या टोळीने मुलुंड पाच रस्ता येथी व्ही. पटेल फार्म या अंगडियाच्या कार्यालयात शस्त्राचा धाक दाखवून ७० लाख रुपयाची रोकड लुटून पोबारा केला होता. या दरोड्याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या दरोड्याची चर्चा संपूर्ण मुंबईत सुरु होती.

दरोडेखोराच्या शोधासाठी पूर्व प्रादेशिक विभागातील विविध पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच मुलुंड पोलीस ठाण्याचे अधिकारी असे ऐकणं १२ पथके या तपासकामी तयार करण्यात आली. पोलिसाच्या  या पथकाने अहोरात्र मेहनत करून काही तांत्रिक पुरावे आणि खबऱ्याच्या मदतीने सुरत, जोनपूर, नवी मुबई आणि डोंबिवली येथून ७ जणांना अटक केली.

अटक करण्यात आलेले आरोपीकडून पोलिसांनी ३७ लाख रुपयाची रोकड, ६ पिस्तूल, मॅगेझीन आणि काडतुसे आणि गुन्हयात वापरलेले वाहन जप्त केलेली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकी मोनू हा जोनपूर येथील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जोनपूर आणि इतर जिल्ह्यामध्ये हत्या, जबरी चोरी, दरोडा सारखे अनके गुन्हे दाखल आहे.

या टोळीचा मोनू हा मास्टर माईंड असून त्याने तुरुंगात असताना ही टोळी तयार केली होती. मुंबई तसेच इतर जिल्ह्यातील अंगाडिया कार्यालय, व्यापारी, व्यवसायिका यांना लक्ष करून त्यांना आपले सावज करून लूटमार करीत होती अशी माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा:

राष्ट्र शब्दच संविधानात येत नाही म्हणत काँग्रेस अपमान का करत आहे?

अहमदाबाद संघाचे झाले बारसे…’हे’ असणार नाव

देशाची थट्टा उडवता, म्हणून काँग्रेस थट्टेचा विषय बनला आहे!

या राज्यात उभारणार लता दीदींच्या नावे संगीत अकादमी आणि संग्रहालय

 

या टोळीतील एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. मुलुंड येथे दरोडा टाकल्यानंतर हो टोळी नवीमुंबईच्या दिशेला पळून गेली होती, त्यानंतर या टोळीने नवीमुंबईतच सर्वांचे समान हिस्से करून प्रत्येकाला आपापल्या वाटेने जाण्यास सांगितले होते. पोलिसांनी या टोळीचा तांत्रिक तपास करून या टोळीला विविध शहरे आणि राज्यातून अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा संपूर्ण तपास पोलीस उपायुक्त  प्रशांत कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांतीलाल कोथम्बिरे, पोलिस निरीक्षक दिलीप धामुनसे, सपोनि संतोष कांबळे, पोउपनी शरद बागल, पोउपनी प्रकाश काळे, पोउपनी मुलानी, पोउपनी पंडित सोनवणे आणि पथके यांनी केले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा