28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरराजकारणउद्धव ठाकरे गटाला पुन्हा खिंडार!

उद्धव ठाकरे गटाला पुन्हा खिंडार!

विदर्भ आघाडी प्रमुख शिल्पा बोडखेंचा 'जय महाराष्ट्र'!

Google News Follow

Related

लोकसभेची निवडणुक काही महिन्यांवर आली असून उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि पक्षाच्या प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ केला आहे.शिल्पा बोडखे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे.तसेच पक्षातील कार्यकर्ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या शब्दाला किंमत देत नसून मनमानी करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

शिल्पा बोडखे यांनी आपल्या पत्रात विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर या महिला कार्यकर्त्यांवर आरोप केला आहे.विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर या दोघी मुंबईच्या कार्यालयात बसून मनमानी कारभार करत असून त्यांनी संघटना विस्कळीत केली, तसेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या शब्दाला त्या किंमत देत नाहीत असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

शिल्पा बोडखे या पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि पक्षाच्या प्रवक्त्या आहेत.शिल्पा बोडखे यांनी सोशल मीडियावर ठाकरे गटाची उत्तमरीत्या बाजू मांडली आहे.मात्र,शिल्पा बोडखे यांच्या राजीमान्यानाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

शिल्पा बोडखे यांनी पत्रात लिहिले की, मी शिवेनेच्या पूर्व महिला आघाडी संपर्क प्रमुख व प्रवक्ता या पदावर प्रामाणिकपणे काम करत संघटना वाढवण्याचा प्रयत्न केला. पण शिवसेना भवनात बसून विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर यांनी सतत षडयंत्र रचून वारंवार संघटन विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा:

मोहम्मद शमी आयपीएलमधून बाहेर

कोलकत्ता उच्च न्यायालयाने बंगाल पोलिसांना फटकारले

शेतकरी-पोलिसांच्या चकमकीत शेतकऱ्याचा मृत्यू

“मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात”

मला वाटले शिवसेना पक्षात शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आणि शिवसेना नेते आदित् ठाकरे यांच्या शब्दाला किंमत आहे, पण आता मला कळाले की येथे विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर यांच्याकडे पक्षाचे पूर्ण अधिकार दिले असून पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाला देखील त्या जुमानत नाहीत. मी पक्षाचे अहोरात्र प्रामाणिकपणे काम करत राहिले आणि विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर या शिवसेना भवनात बसून षडयंत्र रचत राहिल्या.

मला सोशल मीडियाचे काम करायचे नाही म्हणून मी शिवसेना नेते आदित्य ठाकरे याना पत्र पाठवले, परंतु विशाखा राऊत यांना मी काम करून नये आणि त्रस्त होऊन राजीनामा द्यावा असं वाटत आहे. जर यांना संघटना वाढवण्यापेक्षा षडयंत्र रचण्यात एवढा आनंद होत असेल तर मी आपल्या पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि प्रवक्ता पदाचा राजीनामा देत आहे.माझा पक्षात टिश्यू पेपर म्हणून वापर केल्याबद्दल धन्यवाद.

पुढे कोणाचे असेल राजकीय आयुष्य बरबाद करून नका, नाहीतर कोणताही मराठी माणूस मराठी माणसाच्या आणि पक्षाच्या पाठिशी उभा राहणार नाही. कारण शिवसेना पक्षात काम करणाऱ्या लोकांपेक्षा येथे चुगल्या चहाड्या करणार्या आणि षडयंत्र रचणाऱ्यांना जास्त महत्व आहे, असे शिल्पा बोडखे यांनी आपल्या पत्रात लिहून आपण राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा