32 C
Mumbai
Wednesday, January 14, 2026
घरराजकारणजोगेश्वरीकरांवर शोककळा, प्रवीण शिंदे गेले

जोगेश्वरीकरांवर शोककळा, प्रवीण शिंदे गेले

Google News Follow

Related

आपल्या संवेदनशील स्वभावामुळे सर्वसामान्यांना आपलेसे वाटणारे, आपल्या प्रभागातीलच नव्हे तर प्रत्येकाच्या मदतीसाठी वेळीअवेळी धावून जाणारे, अडल्यानडलेल्या सढळ हस्ते मदत करणारे जोगेश्वरीचे माजी नगरसेवक प्रवीण शिंदे यांचे ५ जानेवारीला निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुलगे, नात, भाऊ असा परिवार आहे.

जोगेश्वरी पूर्वेत त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून स्वतःचा एक ठसा उमटविला होता. मध्यंतरीच त्यांना त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण बरे वाटू लागल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले होते. मात्र पुन्हा अस्वस्था वाटल्याने रुग्णालयात दाखल केले गेले. तिथे ते सर्वांशी बोलतही होते. त्याचवेळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या या आकस्मिक निधनामुळे जोगेश्वरी पूर्व परिसरात शोककळा पसरली. प्रवीण शिंदे यांनी केलेल्या कार्याची चर्चा यानिमित्ताने प्रत्येक व्यक्ती करू लागला.

हे ही वाचा:

₹ ऐवजी टाइप केले $; बसला १६ लाखांचा फटका

अपहरण प्रकरणात तीन संशयितांना अटक

आईईपीएफएकडून ‘निवेशक शिबिरा’चे आयोजन

जेएनयूचे नाव बदलून ‘आझाद भगतसिंग विद्यापीठ’ करा

प्रवीण शिंदे यांनी नेहमीच गरजवंतांना सढळहस्ते मदत केल्याचे तिथले रहिवासी सांगतात. कुणाला रुग्णालयात न्यायचे असेल, कुणाला औषधोपचार हवा असेल, कुणाला पैशाची गरज असेल, कुणाच्या घराचे काम राहिले असेल अशा प्रत्येकवेळी प्रवीण शिंदे मदतीला धावले. परिसरातील ज्येष्ठ, महिला, मुले सगळ्यांसाठी प्रवीण शिंदे हे आधार होते. ते आपल्या परिसरात फिरताना प्रत्येकाशी संवाद साधत. त्यांच्याशी दोन घटका बोलून त्याच्याबद्दल आपुलकी दाखवत. त्यातून त्यांचे अनेकांशी उत्तम ऋणानुबंध तयार झाले. दीपक खानविलकर यांनी प्रवीण शिंदे यांच्याबद्दल सांगितले की, आपल्या प्रभागातील दहीहंडी, गणेशोत्सव मंडळांना मदत करणे, विविध संस्थांना हातभार लावणे हे कामही त्यांनी केले. त्यातून ते जनसामान्यांचे नेते बनले. नागरिकांच्या घरी कार्यक्रम असला तर त्यात सहभागी होऊन आपणही त्या कुटुंबाचा भाग असल्याची भावना त्यांनी निर्माण केली. केवळ जोगेश्वरीच नव्हे तर अंधेरी, गोरेगावमधील गरजवंतांनाही त्यांनी मदत केली.

प्रवीण शिंदे यांच्या निधनाची वार्ता समजल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी अनेकांनी गर्दी केली. प्रवीण शिंदे यांच्या आठवणींमुळे लोकांना अश्रु आवरत नव्हते.

१९९७मध्ये ते प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले. तेव्हा ते अपक्ष निवडणूक लढवतानाही शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करून जिंकले होते. ते बेस्ट समितीचे माजी अध्यक्षही होते.

त्यांच्या पार्थिवावर ७ जानेवारीला प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याआधी, सकाळी ९ ते १२ या वेळेत त्यांचे पार्थिव साईधाम सोसायटी, समर्थ नगर मजासवाडी येथे  अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा