32 C
Mumbai
Friday, November 27, 2026
घरराजकारण३० नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन

३० नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन

महिला आरक्षण, मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर चर्चा होण्याची शक्यता

Google News Follow

महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा करण्यासाठी केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनात महिला आरक्षण आणि लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी (परिसीमन) संबंधित विधेयके पुन्हा मांडली जाण्याची शक्यता आहे. या विधेयकांद्वारे लोकसभेची कमाल सदस्यसंख्या सध्याच्या ५५० वरून ८५० पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपासून महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू करण्याच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी यासंदर्भात माहिती दिली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना ३० नोव्हेंबरपासून, तर राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांना २ डिसेंबरपासून सभागृहाचे कामकाज सुरू करण्याची विनंती करण्यात आली आहे. कामकाजाच्या गरजेनुसार दोन्ही सभागृहांचे अधिवेशन ३ डिसेंबरपर्यंत संपण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : 

बनावट भारतीय सोशल मीडिया खात्यांमधून पाकच्या भारताविरोधात कुरापती

भारताकडून पाकिस्तान सीमेवर एस-४००ची पाचवी ढाल

हसीनांच्या माजी उप प्रसिद्धी सचिवासह तिघांना अटक

ममतांच्या भावाची पुतण्या अभिषेक यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार

एप्रिलमधील विधेयक पुन्हा मांडणार

महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना संबंधित घटनादुरुस्ती विधेयक एप्रिलमध्ये लोकसभेत मांडण्यात आले होते. मात्र, आवश्यक दोन तृतीयांश बहुमत न मिळाल्याने १७ एप्रिल रोजी हे विधेयक मंजूर होऊ शकले नव्हते. त्यावेळी उपस्थित ५२८ खासदारांपैकी २९८ जणांनी विधेयकाच्या बाजूने, तर २३० जणांनी विरोधात मतदान केले होते. आता आवश्यक बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने सरकार पुन्हा प्रयत्न करणार आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा