30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरराजकारणफटाक्यांचा विरोध सोडा, प्रदूषण टाळण्यासाठी हे करा...

फटाक्यांचा विरोध सोडा, प्रदूषण टाळण्यासाठी हे करा…

Google News Follow

Related

अध्यात्मिक गुरु, सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी गुरुवार, ४ नोव्हेंबर रोजी एका मुलाखतीचा व्हिडिओ ट्विट केला ज्यामध्ये ते पुन्हा ‘ लहान मुलांच्या हितासाठी’ फटाक्यांवरील बंदी मागे घेण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. “जर तुम्ही प्राणीप्रेमी, पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील माणूस असाल तर तुम्ही रोजच्या मांसाचा वापर कमी केला पाहिजे. मुलांना दिवाळीचा हा आनंदाचा एक दिवस मिळू द्या. त्यामध्ये आडकाठी आणू नका.” सद्गुरूंनी ट्विट केले.

त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “प्राणी आणि पक्ष्यांसाठी ही अचानक चिंतेची बाब आहे. कारण आपल्या अन्नासाठी दररोज आपण या ग्रहावरील २० कोटी प्राण्यांची कत्तल करत आहोत. आपण जे मांस खात आहोत त्याच्या अर्धे मांस जर आपण खाल्ले तर आपण दररोज १० कोटी प्राणी वाचवू शकता. जर तुम्ही प्राणी प्रेमी असाल, तर तुम्ही तेच केले पाहिजे.” असे त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.

“तुम्ही कत्तलखान्यात जाऊन समजून घ्या की तुम्ही जे कबाब खाल्ले होते ते काही काळापूर्वी प्राणी होते. बीफ रोस्ट हा एक अतिशय प्रेमळ प्राणी होता आणि तुम्ही खात असलेली कोंबडी पक्षी होता.” असं ते म्हणाले.

तत्पूर्वी, सद्गुरूंनी ट्विट केले होते. “मानवी कारवायांच्या हानिकारक परिणामांवर उपाय शोधल्याशिवाय आणि अंमलात आणल्याशिवाय आपण मानवी कल्याणाबद्दल बोलू शकत नाही. केवळ मानवी चेतना वाढवून आपण आपल्या ग्रहाच्या पर्यावरणीय स्थितीचे पुनरुज्जीवन करण्याचे व्रत करू शकतो.”

हे ही वाचा:

कच्च्या तेलापाठोपाठ आता खाद्य तेलही झाले स्वस्त

आर्यन खानची केस थेट दिल्ली एनसीबीकडे

उत्तरप्रदेश, हरियाणानंतर मध्यप्रदेशात येणार ‘हा’ कायदा

विराट सेनेने स्कॉटलंडचा उडवला ८ विकेट्सनी धुव्वा

सद्गुरुंनी ‘ज्यांना प्रदूषणाची काळजी आहे’, त्यांना असा पर्यायी उपाय सांगितला, “वायू प्रदूषणाची चिंता हे मुलांना फटाक्यांचा आनंद घेण्यापासून रोखण्याचे कारण नाही. त्यांच्यासाठी तुमचा त्याग म्हणून, तुमच्या ऑफिसला ३ दिवस चालत जा. त्यांना फटाके फोडण्याची मजा लुटू द्या.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा