33 C
Mumbai
Saturday, November 27, 2021
घरराजकारणभंगारवाला करोडपती कसा झाला?

भंगारवाला करोडपती कसा झाला?

Related

भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांनी शनिवार, ६ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्यावर हल्ला चढवला आहे. भंगारवाला करोडपती कसा झाला? असा सवाल मोहित कंबोज यांनी विचारला आहे. तर यावेळी त्यांनी नवाब मलिकांचा कोट्यावधीच्या संपत्तीचे पोलखोल केली आहे

ऐन दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी मोहित कंबोज यांनी राजकीय फटाके फोडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांच्याकडे तब्बल तीन हजार कोटींची संपत्ती असल्याचा दावा कंबोज यांनी केला आहे. मलिक यांच्या नावावर एकूण बावीस संपत्ती असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. नवाब मलिक यांच्या कुटुंबाशी फॅमिली ट्रस्टच्या माध्यमातून ही संपत्ती जोडलेली आहे असा आरोप मोहित कंबोज यांनी केला. तर राज्यातील जनतेला भंगारवाला करोडपती कसा झाला हे कळलेच पाहिजे असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

आर्यन खानची केस थेट दिल्ली एनसीबीकडे

पालघरमध्ये पोलिसाचेच Hit And Run

विराट सेनेने स्कॉटलंडचा उडवला ८ विकेट्सनी धुव्वा

चिमुरडीने का लिहिले सरन्यायाधीशांना पत्र?

नवाब मलिक यांनी आमच्यावर १०० आरोप केले पण एकाही आरोपाचा त्यांनी पुरावा दिला नाही. त्यांचे सर्व आरोप खोटे आहेत. ते खासगी त्रासाचा सूड उगवत नाहीत ना? असा सवालही मोहित कंबोज यांनी केला आहे. तर नवाब मलिक यांची मी सगळी पोलखोल करणार असल्याचेही मोहित कंबोज यांनी सांगितले आहे. राज्यात सलीम-जावेदने चित्रपट सुरू केला असला तरी याचा दी एन्ड मीच करणार आहे. सलीम-जावेद यांच्या चित्रपटाचा खरा चेहरा आणि खरी स्क्रिप्ट आता जगासमोर येणार आहे असा इशाराही मोहित कंबोज यांनी दिला आहे.

आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणात नवाब मलिक यांनी मोहित कंबोज यांचे नाव घेत त्यांच्यावर आरोप केले होते. यासाठी मोहित कंबोज यांनी मलिकांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा शंभर कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे. तर आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना नवाब मलिक यांच्या पासून धोका असल्याची पोलिस तक्रारही त्यांनी दाखल केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,506अनुयायीअनुकरण करा
4,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा