28 C
Mumbai
Saturday, February 7, 2026
घरराजकारणसुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

राष्ट्रवादीच्या आमदारांनी एकमताने विधिमंडळ नेतेपदी केली निवड

Google News Follow

Related

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेणार असल्याचे समोर आले आहे. सायंकाळी ५ वाजता सुनेत्रा पवार पदाची शपथ घेतील. दरम्यान या शपथविधीपूर्वी विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक पार पडली. यात सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या आमदारांनी एकमताने विधिमंडळ नेतेपदी निवड केली. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व आमदार, मंत्री आणि नेते उपस्थित होते.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गटनेते पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी मांडला. तर या प्रस्तावाला पक्षाचे जेष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले. यानंतर, सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड झाली आहे. आता सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. त्यामुळे अजित पवारांच्यानंतर इथून पुढे सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर पक्षाची धुरा असणार आहे. संध्याकाळी पाच वाजता त्यांचा राज्यपाल भवनात शपथविधी पार पडणार आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे कुठल्या खात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडून सोपवण्यात येईल या बद्दल सध्या तरी काही माहिती समोर आलेली नाही. त्या आधी राज्यसभेत खासदार होत्या.

महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर मोठी राजकीय घडामोड घडताना दिसत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभावी नेते असलेल्या अजित पवार यांच्या निधनामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर कोण नेतृत्व करणार, याबाबत चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव पुढे आले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे जाणार असल्याची अधिकृत माहिती दिली.

हे ही वाचा:

आत्मनिर्भरतेकडे भारताचे पाऊल! देशात L410 NG विमानाची निर्मिती होणार?

नागपाड्यात दोन गटांत हाणामारी; पाच जखमी, १२ जणांना अटक

अर्थसंकल्प विशेष: महागाईच्या मूल्यांकनाचा चेहरा मोहरा बदलणार

दिल्ली स्फोटप्रकरणातून नवी माहिती, यहुदी कॉफी चेनला करायचे होते लक्ष्य

सध्या सुनेत्रा पवार या ना विधानसभेच्या, ना विधानपरिषदेच्या सदस्य आहेत. तसेच त्यांनी यापूर्वी थेट राज्य राजकारणात सक्रिय भूमिका बजावलेली नाही. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी त्यांच्यावर जबाबदारी येण्याची शक्यता आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा