26 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरराजकारणसुषमा अंधारे बरळल्या, म्हणतात आधी आरएसएस हेडक्वार्टर उद्ध्वस्त करा!

सुषमा अंधारे बरळल्या, म्हणतात आधी आरएसएस हेडक्वार्टर उद्ध्वस्त करा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका

Google News Follow

Related

शिवसेना उबाठा पक्ष आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात भूमिका घेऊ लागला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने उबाठाने आरएसएसविरोधावर लक्ष्य केंद्रित केले आहे. पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे याच मुद्द्यावर बरळल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आधी उद्ध्वस्त करा मग बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घ्या, असा इशारा दिला.

त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमच्यात जर हिंमत असेल तर आधी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मनुवादी विचारांना कडाडून विरोध केला, त्या विचारांवर चालणारे आरएसएस हेडक्वार्टर उध्वस्त करा. सगळे खाकी चड्डी आणि काळी टोपीवाले लोक दीक्षाभूमीवर ओळीने उभे करा आणि मग त्यांच्या तोंडून बाबासाहेब ऐकायला लोक तयार होतील असे अंधारे म्हणाल्या. खबरदार, तुमच्या बेकीच्या राजकारणासाठी बाबासाहेबांचे नाव वापराल तर याद राखा, असा इशारा देखील अंधारे यांनी दिला.

हे ही वाचा:

ट्रम्प यांचा ‘मी पणा’ सुरूच! आता मी अफगाण-पाक युद्ध थांबवणार

कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणी सात ठिकाणी छापेमारी

‘स्वदेशी भारत’ चे स्वप्न साकार होतेय

ठेकेदारीच्या पैशावरून वाद — हातगाडी चालकाचे अपहरण करून खून!

निवडणुकींच्या आधी हा हिंदू, तो मुस्लिम, हा मराठा, तो ओबीसी अशी तोडफोड करणं ही देवेंद्र फडणवीसांच्या महाराष्ट्रातील आजच्या राजकारणाची गरज आहे. कारण आज आणखी महत्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. पूरग्रस्त भागातील प्रश्न असतील, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, वाढती महागाई, पुण्यातील मुंबईतील वाढती गुन्हेगारी या सगळ्या विषयावर सपशेल अपयशी ठरलेल्या फडणवीसांना नॉन इशूवर चर्चा करणे ही त्यांच्या करीअरची गरज आहे. यासाठी त्यांनी त्यांच्या ब्रिगेडला आता बाबासाहेब आंबेडकरांचे नाव वापरायला सांगितले आहे, असे अंधारे म्हणाल्या.  त्या म्हणाल्या की, फडणवीस जरा सावधान. बाबासाहेब यांच्याबद्दल खरंच प्रेम, आदर असेल तर त्यांचे अनेक संदर्भ आणि दाखले द्यायचे असतील तर बाबासाहेब तुम्हाला इतके सहजासहजी पेलणारे, झेपणारे नाहीत. मनुवादी विचारांना त्यांनी विरोध केला होता. फडणवीस तुम्हाला बाबासाहेबांचे तुम्हाला अनुयायी व्हायचे असतील तर तुम्ही मनुवादी विचारांचे केंद्र असलेल्या आरएसएसला उद्धस्त करा.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा