कफ सिरप प्यायल्यामुळे देशभरात २२ बालकांचा मृत्यू झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात कोल्ड्रिफ कफ सिरपची निर्मिती करणाऱ्या श्रीसन फार्मास्युटिकल्सच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. मालक रंगनाथन याला चेन्नई येथे अटक करण्यात आली. यानंतर आता कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणात कारवाई अधिक तीव्र झाली आहे.
कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणात सोमवारी, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) श्रीसन फार्माशी संबंधित परिसरात छापे टाकले. मध्य प्रदेशात या विषारी कफ सिरपमुळे २० हून अधिक मुलांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. सध्या तपास सुरू आहे. श्रीसन फार्मा या सिरप उत्पादक कंपनीचे मालक जी. रंगनाथन यांना अटक करण्यात आली आहे. चेन्नई कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणासंदर्भात ईडीने पीएमएलए अंतर्गत तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथील श्रीसन फार्माच्या सात ठिकाणी छापे टाकले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, या छाप्यांमध्ये तामिळनाडू ड्रग कंट्रोल ऑफिसच्या उच्च अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांचाही समावेश आहे.
हे ही वाचा..
युद्धबंदी होताच ट्रम्प इस्रायल दौऱ्यावर
गुरुग्राममध्ये संयुक्त पथक-दोन शार्पशूटर यांच्यात चकमक
‘स्वदेशी भारत’ चे स्वप्न साकार होतेय
अखेर महिलांना तालिबानी पत्रकार परिषदेत प्रवेश, महिला अधिकारांवरून विचारले प्रश्न
कफ सिरप प्यायल्यामुळे देशभरात २२ बालकांचा मृत्यू झाला. कोल्ड्रिफ या कफ सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल (DEG) आणि इथिलीन ग्लायकोल (EG) असे विषारी पदार्थ असल्याचे आढळून आले. या सिरपचे सेवन केल्यानंतर राजस्थान, मध्य प्रदेशातील बालकांचा मृत्यू झाल्याने देशभरात खळबळ उडाली. देशभरात या सिरपवर बंदी आणल्यानंतर आता जागतिक आरोग्य संघटनेनेही चिंता व्यक्त केली. संघटनेने भारतीय अधिकाऱ्यांना विचारले की, संबंधित कफ सिरप इतर देशांमध्ये निर्यात करण्यात आले होते का? यावर भारतानेही म्हटले की, कोल्ड्रिफ, रेस्पिफ्रेश टीआर आणि रिलाइफ हे तीन कफ सिरप परत मागवण्यात आले आहेत. शिवाय या तिन्ही कफ सिरपचे उत्पादन थांबवण्यात आले आहे. तर, यापैकी कोणतेही उत्पादन भारतातून निर्यात केले गेले नाही.







