29 C
Mumbai
Wednesday, November 25, 2026
घरराजकारणप्रणव मुखर्जींनी सल्ला दिल्यामुळे शुभेंदू अधिकारी आले मोदींसोबत

प्रणव मुखर्जींनी सल्ला दिल्यामुळे शुभेंदू अधिकारी आले मोदींसोबत

बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी केला गौप्यस्फोट

Google News Follow

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते शुभेंदू अधिकारी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याबाबत एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. तृणमूल काँग्रेस (टीएमसी) सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाण्याचा सल्ला प्रणव मुखर्जी यांनीच आपल्याला दिला होता, असे अधिकारी यांनी सांगितले. राष्ट्रपती भवनात मुखर्जी यांच्यासोबत झालेल्या एका चर्चेची आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

२४ नोव्हेंबर रोजी कोलकाता येथे आयोजित ‘द इकॉनॉमिक टाइम्स बंगाल असेंड्स’ या शिखर परिषदेत बोलताना शुभेंदू अधिकारी यांनी हा खुलासा केला. त्यांनी प्रणव मुखर्जी यांचा उल्लेख आपले ‘मूळ मार्गदर्शक’ असा केला. प्रणव मुखर्जी राष्ट्रपती झाल्यानंतर आपण त्यांची भेट घेण्यासाठी रायसीना हिल येथे गेलो होतो, असे अधिकारी यांनी सांगितले. त्या भेटीत मुखर्जी यांनी आपल्याला राजकीय भवितव्याबाबत सल्ला दिला होता.

अधिकारी म्हणाले, “प्रणवजी मला म्हणाले होते, तुम्हाला काय करायचे आहे, याचा विचार करा. तुम्हाला केवळ कोणाच्या तरी हाताखाली काम करत राहायचे असेल, तर इथेच राहा. मात्र, स्वतःच्या बळावर पुढे जायचे असेल, तर मोदीजींसोबत राहा.”

तृणमूल काँग्रेसच्या अंतर्गत कामकाजाबाबत प्रणव मुखर्जी यांनी केलेल्या निरीक्षणाचाही अधिकारी यांनी उल्लेख केला. त्यांच्या मते, तृणमूल काँग्रेस हा काकू-पुतण्याच्या जोडीकडून चालवला जाणारा पक्ष होता. या माध्यमातून त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला.

“तो एकाच व्यक्तीचा, एकाच महिलेचा आणि काकू-पुतण्याचा पक्ष होता. एखाद्या कंपनीप्रमाणे त्याचे कामकाज चालत होते. जणू काही तिथे व्यवस्थापकीय अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते,” असे अधिकारी म्हणाले.

आपणही त्या पक्षात होतो; मात्र केवळ कोणाच्या तरी हाताखाली काम करत राहण्याची इच्छा नसल्यामुळे आपण पक्ष सोडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रणव मुखर्जी हे आपल्यासाठी केवळ राजकीय मार्गदर्शक नव्हते, तर पालक आणि सल्लागारही होते, असेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

हिंदूंना न्याय दिलात तर खबरदार…

उमर खालिद, शर्जिल इमामला जामीन नाही!

युवीचा गुरुमंत्र, वैभवचा षटकारतंत्र!

ऑक्टोबरमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची ९ टक्क्यांनी झेप

“ते माझे पालक आणि सल्लागार होते. राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक भारतीय प्रणव मुखर्जी यांचा आदर करतो,” असे अधिकारी म्हणाले.

प्रणव मुखर्जी आणि आपल्यातील ही चर्चा नेमकी कधी झाली, असा प्रश्न विचारण्यात आला असता सुवेंदू अधिकारी यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. दिवंगत नेत्याच्या वक्तव्यावरून कोणताही वाद निर्माण व्हावा, अशी आपली इच्छा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा