29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरधर्म संस्कृतीपोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेली मंदिरे पुन्हा बांधली जाणार

पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेली मंदिरे पुन्हा बांधली जाणार

Google News Follow

Related

गोवा सरकारची मोठी घोषणा

गेल्या काही दिवसांपासून देशात ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा गाजत असतानाच आता मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी आणि इतर धार्मिक स्थळांबाबतही वाद सुरू झाला आहे. दरम्यान, गोवा सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. गोव्यात पोर्तुगीजांनी जी मंदिरं उध्वस्त केली त्याची पुनर्बांधणी करण्यात येणार असल्याची घोषणा गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

गोव्यात पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेली मंदिरे पुन्हा बांधली जातील, अशी घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली आहे. पोर्तुगीज राजवटीत नष्ट झालेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी गोवा सरकारने अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली आहे.
गोव्यातील प्रमोद सावंत सरकारने गेल्या काही महिन्यांपासून विभागीय सर्वेक्षण सुरू केले होते. याच सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीच्या आधारे गोवा सरकार आता पुढील निर्णय घेत आहे.

पोर्तुगीज राजवटीत अनेक मंदिरे पाडली गेली, ती पुन्हा बांधली जातील. तुम्हाला सांगतो की पोर्तुगीजांनी हिंदू मंदिरांच्या जागी इतर धर्मीयांची प्रार्थनास्थळे बांधली होती. या मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी अर्थसंकल्पात निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

दाऊद कराचीत; दाऊदच्या भाच्याने दिली कबुली

‘यशवंत जाधव हे उद्धव ठाकरेंचा उजवा हात’

हे सरकार पाण्याचा शत्रू

इंग्लंडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांपुढे सोनिया गांधीनी पसरला पदर

दरम्यान, ज्ञानवापी मशिदी प्रकरणी आज वारणसीच्या जिल्हा कोर्टात सुनावणी पार पडली. आज दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं सुनावणीसाठी पुढची तारीख दिली आहे. या प्रकरणी आता २६ मे रोजी पुढील सुनावणी पार पडणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा