राज्यातल्या जनहिताच्या विषयांकडे दुर्लक्ष करत असलेल्या सरकारच वर्णन ‘खावाले काळ, नी भूईले भार हे ठाकरे सरकार’ असंच कराव लागेल अशी अहिराणी भाषेत टीका आज भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी आज येथे केली.
ठाकरे सरकार शेतकऱ्यांचे रक्षणकर्ते नसून अनेक घोटाळेबाज धर्मभास्कर वाघांचे आश्रयदाते आहेत, अशा घणाघाती टीका भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केलीय. त्यांनी धुळ्यात पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. ते ३ दिवसांच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज (४ ऑगस्ट) धुळे येथे संघटनात्मक बैठका घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
आशिष शेलार म्हणाले, “धुळे जिल्हा परिषदेतील कोट्यावधींच्या अपहार प्रकरणाचा मुख्य सुत्रधार धर्मभास्कर वाघ याची राज्यातील जनतेला सतत आठवण व्हावी आणि घोटाळ्यांमध्ये धर्मभास्करचे बाप निघावेत असे एक एक घोटाळेबाज चेहरे ठाकरे सरकारच्या काळात उघड होत आहेत. धर्मभास्कर म्हणेल बाप रे बाब! असे चित्र सध्या आहे. पोलीस यंत्रणेचे कधी नव्हे तेवढे खच्चीकरण ठाकरे सरकारच्या काळात झाले. अधिकऱ्यांमध्ये वॉर सुरू आहे. बार, पब, डिस्को, लेडीज बार आणि काळे धंदे राजरोस पणे सुरु आहेत. दलालांमार्फत बदलत्या आणि बदल्यांची दलाली घेणे सुरू आहे. आता चाईल्ड पॉर्नोग्राफी सारखे भयंकर प्रकार उघड होत आहेत.”
“दुसरीकडे सरकारची प्रशासकीय यंत्रणा कोलमडली आहे. अनेक आएएस दर्जाचे वरिष्ठ अधिकारी अनेक दिवस नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत, तर सतत बदल्या करुन अधिकाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करण्यात आले आहे. तीन कारभारी आणि रोज बदला अधिकारी अशी स्थिती राज्यात पहायला मिळते आहे,” अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
हे ही वाचा:
ज्यांना नीट वाचता येत नाही, त्यांनी केंद्राला सल्ले देण्याचा उद्योग बंद करावा
उपांत्य फेरीत लवलिनाचा पराभव तरीही ‘हे’ पदक केलं निश्चित
भालाफेक, कुस्तीमध्ये भारतीय खेळाडूंचा बोलबाला
आशिष शेलार म्हणाले, “प्रशासनावर कुणाची पकड नाही. अधिकारी मंत्र्यांना जुमानत नाही. भ्रष्टाचार बोकाळला आहे. बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असल्याचे उघड होते आहेत. बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. एकीकडे राज्यात कोरोना, पाऊस, वादळ अशा आपत्तींनी थैमान घातले आहे, अशावेळी प्रशासनामध्ये यादवी माजली आहे. कुणाचे कोण ऐकत नाही. राज्य शासनाच्या दिशाहीन कारभारामुळे राज्याची दिशा कोणती हे कळत नाही असे चित्र आहे.”







