27 C
Mumbai
Friday, January 23, 2026
घरराजकारणडॅमेज कंट्रोलची गरज ठाकरे सरकारला आहे, भाजपाला नाही

डॅमेज कंट्रोलची गरज ठाकरे सरकारला आहे, भाजपाला नाही

Google News Follow

Related

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्हा भाजपाला मोठी गळती लागली आहे. भाजपाच्या अनेक नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत प्रवेश केलाय. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज जळगाव जिल्ह्याचा दौरा केला. मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळामुळे झालेल्या शेती आणि केळीबागेच्या नुकसानाची पाहणी हे फडणवीसांच्या दौऱ्याचं मुख्य कारण होतं. मात्र यावेळी पत्रकारांनी जळगाव जिल्ह्यात भाजपाला लागलेल्या गळतीच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला असता, डॅमेज कंट्रोलची गरज ठाकरे सरकारला आहे, भाजपाला नाही, असा दावा फडणवीस यांनी केलाय.

रक्षाताई खडसे या भाजपाच्या खासदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात आल्यावर त्यांनी मला चहाचं निमंत्रण दिलं. माझ्या भाजपाच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्या घरी मी चहाला गेलो. त्यामुळे यात कुणीही वावगं समजण्याचं कारण नाही, असं फडणवीस यांनी म्हटलंय. त्याचबरोबर डॅमेज कंट्रोलची गरज या सरकारला आहे. ठाकरे सरकारवर रोज लागणारे आरोप, सरकारची झालेली अवस्था आणि नुकताच लागलेला पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल, त्यामुळे या सरकारला डॅमेज कंट्रोलची गरज असल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. आपला जळगाव दौरा फक्त शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी असल्याचंही त्यांनी सांगितलं.

फडणवीस आणि शरद पवार भेटीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केलीय. त्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी राऊतांना टोला हाणलाय. संजय राऊत यांची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाली आहे. याचा वाईट अर्थ घेऊ नका, ते चांगले संपादक आहेत. पण ते नेमके कुणाचे आहेत, असा प्रश्न सातत्याने पडतो. त्यातच आता सामनाच्या मुख्य संपादक आमच्या वहिनी म्हणजे रश्मीताई ठाकरे आहेत. त्यामुळे संजय राऊत यांची अवस्था सध्या ‘ना घरका ना घाटका’ अशी झाली असल्याची टीका फडणवीसांनी केलीय.

हे ही वाचा:

मराठा आरक्षणासाठी, आघाडीतील आमदारांनी राजीनामे द्यावेत

मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी ८ सदस्यीय टीम डोमिनिकामध्ये

२०२१ मध्ये भारतात १०१ टक्के पाऊस पडणार

मुंबई महापालिका निवडणूक दोन वर्ष पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव

जळगाव जिल्ह्यात वादळी वारे आणि पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची स्थिती वाईट झाली आहे. मागच्या नुकसानाचे पैसे अजून मिळाले नसल्याचं शेतकरी सांगत आहेत. कोकणात सरकार धावलं पण आपल्याकडे दुर्लक्ष होत आहेत. पीक विमा उतरवला जात नाही. विमा कंपन्यांचे लोक पोहोचत नाहीत. जिथे जातात तिथे कमी नुकसान दाखवत आहेत. योग्य नुकसान दाखवण्यासाठी त्या लोकांकडून पैशांची मागणी होतेय. सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करा अशी मागणी फडणवीस यांनी यावेळी केलीय.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा