“राज्यात बार सुरू, मंदिर बंद असा कारभार सुरू आहे. जन्माष्टमीच्या दिवशी मंदिर खोलो आंदोलन करण्यापूर्वीच मला कार्यालयात अटक करण्यात आली. अविनाश पवार या अधिकाऱ्याने ही दंडेली केली. आता त्यांनी ‘हक्कभंगा’साठी तयार राहावे. ठाकरे सरकारची गळचेपी फार काळ चालणार नाही.” असं ट्विट भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी केलं आहे.
राज्यात बार सुरू, मंदिर बंद असा कारभार सुरू आहे. जन्माष्टमीच्या दिवशी मंदिर खोलो आंदोलन करण्यापूर्वीच मला कार्यालयात अटक करण्यात आली. अविनाश पवार या अधिकाऱ्याने ही दंडेली केली. आता त्यांनी 'हक्कभंगा'साठी तयार राहावे.
ठाकरे सरकारची गळचेपी फार काळ चालणार नाही. pic.twitter.com/QO11t6E83q— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 30, 2021
भाजपाने राज्यभरात मंदिरं खुली करण्यासाठी शंखनाद आंदोलन सुरु केलं आहे. याच आंदोलनावेळी, आंदोलन सुरु करण्यापूर्वीच अतुल भातखालकरांना अटक करण्यात आली. कोरोनाचे नियम न जुमानता राज्यभरात मोठ्या गर्दीत राजकीय यात्रा आणि सभांना परवानगी आहे, हॉटेल्स मॉल सुरु झाली, मात्र मंदिरात जाण्यासाठीच भाविकांना का रोखले जाते. फक्त मंदिरं खुली केल्यानेच कोरोना वाढतो, का असा सवाल करत भारतीय जनता पक्षाने आज राज्यभरात आंदोलनाला सुरुवात केली आहे.
महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांचे केंद्रस्थान मानल्या जाणाऱ्या नाशिकमध्येही ही निदर्शनं झाली. भाजपा अध्यात्मिक आघाडीच्या वतीने रामकुंड परिसरात आंदोलन करण्यात आलं. यावेळी साधू महंत आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली. नाशिकमध्ये आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. यावेळी महापौरांचीही उपस्थिती होती. सरकारला टल्ली झालेले लोक चालतात, मग देवाच्या भक्तीत तल्लीन झालेले लोक चालत नाही, असा सवाल नाशिकमधील साधू-महंतांनी केला.
हे ही वाचा:
भारताला पॅरालिम्पिकमध्ये भरघोस यश
ऐरोलीत नेलेला मासळी बाजार पुन्हा आला मूळ ठिकाणी; कसा झाला हा चमत्कार?
पुण्यातील भाजपा आघाडीनंही घोषणाबाजी करत आंदोलन केले. पुण्याचं ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीच्या मंदिरात हे आंदोलन करण्यात आलं. हाथी घोडा पालखी, जय कन्हैया लाल की, अशी घोषणा देत आज जन्माष्टमीचा मुहूर्त साधत मंदिरं उघडण्यासाठी जोरदार मागणी केली. लोकभावनेचा आदर करत मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मंदिरं उघडावीत, अशी मागणी केली.







