29 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
घरराजकारण'मेटेंची गाडी ओव्हरेटक करताना ड्रायव्हरचं जजमेंट चुकलं आणि अपघात झाला'

‘मेटेंची गाडी ओव्हरेटक करताना ड्रायव्हरचं जजमेंट चुकलं आणि अपघात झाला’

Google News Follow

Related

राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. विधानसभेत वर्षा गायकवाड यांनी मुंबई-पुणे महामार्गावरील अपघाताचा मुद्दा उपस्थित केला. चालकाचा अंदाज चुकल्याने विनायक मेटे यांचा अपघात झाला आहे. चालकाने गाडी ओव्हरटेक केली होती. अपघाताचे लोकेशन न मिळाल्याने मदत पोहोचायला उशीर झाला, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघातानंतर मुंबई पुणे महामार्गावर झालेला अपघाताची सरकराने चौकशी लावली असल्याचे म्हणत यावर सरकार काय उपाययोजना करणार असा सवाल वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, यंत्रणा बदलणं गरजेचं आहे. मेटे यांचा जागीच मृत्यू झाल्याची डॉक्टरांनी माहिती दिली आहे. मात्र, मेटे यांच्या अपघाताच्या निधनाबाबत अनेक गोष्टी कार्यकर्ते आणि त्यांच्या पत्नीने माझ्याजवळ उपस्थित केल्या आहेत. मेटे यांच्या चालकाने ओव्हरटेक केल्याने अपघात झाला आहे. चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करताना ही घटना घडली आहे. या घटनेबद्दल विस्तृत माहिती समोर आल्यावरच बोलता येईल. मात्र गंभीर बाब म्हणजे मेटेंच्या चालकाने फोन केल्यानंतरही वेळेत मदत पोहचली नाही,असे म्हटले आहे.

पुढे फडणवीस म्हणाले, मेटे यांच्या चालकाने सांगितल्याप्रमाणे नवी मुंबई आणि रायगड पोलीस त्यांच्या रस्त्यात शोध घेत होते. पण अपघाताची लोकेशन कळू शकत नव्हते. त्यामुळे यंत्रणा बदलणं गरजेचं आहे. अपघात झाल्यानंतर थेट लोकेशन मिळणे सोपे होईल, अशी यंत्रणा उभी करण्यावर आम्ही भर देतोय. तसेच चौथी लेन तयार करण्यात यावी यासाठीही आम्ही प्रयत्न करतोय, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. लेन सोडून चालणाऱ्या ट्रेलरवर कारवाई करणार, लेन सोडून जाणाऱ्या ट्रेलरची माहिती मिळाल्यास थेट कारवाई करता येईल, अशी यंत्रणा उभी करणं गरजेचं असून त्यावर आम्ही अत्याधुनिक टेक्नोलॉजीचा वापर करणार आहोत, असंही फडणवीस यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना होणार अटक?

एम्स आता ओळखले जाणार ‘या’ नावाने

प्रवासाबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपण रात्रीचा प्रवास टाळला पाहिजे. मीसुद्धा रात्रीचा प्रवास करतो. परंतु, आपण सर्वांनी रात्रीचा प्रवास टाळला पाहिजे कारण रात्रीचा अपघात होण्याची शक्यता असते. विनायक मेटे यांच्या चालकाचा जबाब बदलत आहे. घातपात आहे की नाही याची शंका उपस्थित होऊ नये म्हणून सीआयडी या प्रकरणाचा तपास करणार आहे. अपघातात काही शासकीय मदत मिळण्यास काही त्रुटी झाली आहे का? याचाही तपास करण्यात येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा