34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
घरराजकारणहे महाविकास सरकार नसून हे वसूली सरकार आहे

हे महाविकास सरकार नसून हे वसूली सरकार आहे

Google News Follow

Related

केंद्रीय दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी महाविकास आघाडी सरकारला ‘वसुलीचे वसुलीने वसुलीसाठी चालवलेले सरकार’ असे म्हटले आहे. दिल्लीतील एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना प्रसाद यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे यांनी सरकार चालवण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. त्याबरोबर त्यांनी हे देखील सांगितले की, भारताच्या इतिहासात प्रथमच एका शहराच्या एका पोलिस आयुक्ताने राज्याच्या गृहमंत्र्याने अशा तऱ्हेचा खंडणीखोरीचा आरोप केला आहे.

त्यानंतर त्यांनी जर एका मंत्र्याचं टार्गेट १०० कोटींचं असेल तर इतर मंत्र्यांची किती आहेत, याचं उत्तर अजून मिळालेलं नाही असे देखील सांगितले.

हे ही वाचा:

हायवे बांधणीचा वेग ‘द्रुतगती’वर

भाजपाच्या आरोपांना उत्तरे द्या नवाब मलिक, भ्रमिष्टा सारखे बोलू नका

‘पेन ड्राईव्ह’ घेऊन फडणवीस दिल्लीत

त्याबरोबरच त्यांनी एटीएसने घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून देखील टीका केली. ते म्हणाले की, मी एटीएसची पत्रकार परिषद पाहिली, ज्यात नंतर कोणत्याही तऱ्हेचे प्रश्न घेण्यात आले नाहीत. महाराष्ट्रात जे चालू आहे, ते विकास नसून वसूली आहे. महाराष्ट्रात खेला होत आहे, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रातल्या सद्य परिस्थितीवर ते म्हणाले, की महाराष्ट्रात नक्की सरकार कोण चालवत आहे, हेच कळत नाही. महाराष्ट्राच्या इतिहासातील हे सर्वात गोंधळलेले सरकार आहे का? वसूली आघाडी नक्की कोणत्या दिशेने जात आहे?

प्रसाद यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर देखील टीका केली. त्यांनी पवार अनिल देशमुखांना कोणाच्या दबावाखाली वाचवत आहेत असा सवाल देखील उपस्थित केला? त्याबरोबरच त्यांनी शरद पवार यांची विश्वासार्ह्यता परत मिळवण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे अनिल देशमुख यांचा राजीनामा असा सल्ला देखील दिला. यावेळी त्यांनी या सरकारवर विकास सरकार नसून वसुली सरकार आहे, अशी टीका देखील केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा