पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बंगालमध्ये हिंसाचाराला सुरूवात झाली आहे. तृणमुल काँग्रेसच्या गुंडांनी अनेक ठिकाणी जाळपोळ आणि हत्याकांडाच्या सत्रांना प्रारंभ केला आहे. त्यावरून अनेकांनी तृणमूलला लक्ष्य केले आहे. अभिनेत्री कंगना राणावत हिने देखील ममता बॅनर्जींवर निशाणा साधला होता. त्यामुळे ट्वीटरने तिचे अकाऊंट बंद केले आहे. परंतु हिंदू धर्माबद्दल गरळ ओकणाऱ्या शरजीलचे ट्वीटर अकाऊंट मात्र चालू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ट्वीटरचा दुटप्पीपणा उघड झाला आहे.
कंगना राणावत हिने एकामागून एक ट्वीट करत ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केली होती. ट्वीटर या संकेतस्थळाच्या नियमावलीनुसार ही ट्वीट्स आक्षेपार्ह होती. त्यामुळे हेच कारण पुढे करत ट्वीटरने तिचे खाते बंद केले आहे.
हे ही वाचा:
लक्षात ठेवा, टीएमसीचे खासदार, मुख्यमंत्री दिल्लीतसुद्धा येतात- प्रवेश सिंह वर्मा
कंगनाने आपल्या वेगवेगळ्या ट्वीटमधून तृणमूलच्या गुंडांनी बंगालमध्ये मांडलेल्या हैदोसावर टीका केली होती. त्याबरोबरच तिने बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी देखील केली होती. त्याबरोबरच तिने आसाम आणि पुद्दुचेरी जिथे भाजपाचा विजय झाला आहे, त्याठिकाणी हिंसाचार झालेला आढळून आला नसल्याचे देखील म्हटले आहे. तिने तिच्या ट्वीट्समध्ये जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचा देखील उल्लेख केला होता.
भारताच्या एकूण पाच राज्यात निवडणुका झाल्या. त्यात पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. या निवडणुकीचा निकाल २ मे रोजी लागला. या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.







