27.8 C
Mumbai
Wednesday, August 5, 2026
घरराजकारणअभिनेत्री तृषाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी; उदयनिधी स्टॅलिन यांना घेतले ताब्यात

अभिनेत्री तृषाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी; उदयनिधी स्टॅलिन यांना घेतले ताब्यात

गुन्हा दाखल

Google News Follow

Related

तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री आणि द्रमुक (DMK) नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी अभिनेत्री तृषा कृष्णन यांच्याबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी पोलिसांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

वादाची सुरुवात उदयनिधी स्टॅलिन यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे झाली. त्यांच्या भाषणातील अभिनेत्री तृषा कृष्णन यांच्याविषयीचा उल्लेख महिलांचा अपमान करणारा आणि अश्लील स्वरूपाचा असल्याचा आरोप करण्यात आला. भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने या वक्तव्याचा तीव्र निषेध करत पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली.

माहितीनुसार, पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांअंतर्गत उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांकडून या प्रकरणातील व्हिडिओ, भाषणाची संपूर्ण ध्वनिचित्रफीत आणि इतर पुराव्यांची तपासणी केली जात आहे.

सोमवारी तंजावरमध्ये झालेल्या डीएमकेच्या सभेनंतर हा वाद निर्माण झाला, जिथे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांना प्रत्युत्तर देताना उदयनिधी स्टॅलिन यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांना लक्ष्य केल्याचा आरोप आहे. आंदोलनादरम्यान, स्टॅलिन यांनी त्रिशा यांच्याबद्दल एक द्व्यर्थी टिप्पणी केली. कावेरी पाणीवाटप वादावरून सुरू झालेले हे आंदोलन लवकरच एक राजकीय मुद्दा बनले.

 ही वाचा:

मोदी हे इस्रायलचे सर्वोच्च मित्र!

लग्नाची शेरवानी जाळली; इस्त्रीवाल्याला १४ हजारांचा ‘चटका’

भारतीय ‘धुरंधरां’नी ३० हून अधिक दहशतवादी टिपले

डाबरला मध, तूपासह अनेक उत्पादनांची विक्री थांबवण्याचे आदेश

दरम्यान, द्रमुकने उदयनिधी स्टॅलिन यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा पक्षाने केला असून, राजकीय हेतूने हा वाद निर्माण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. संपूर्ण भाषणाचा संदर्भ न घेता काही भाग व्हायरल करून दिशाभूल केली जात असल्याचे द्रमुकचे म्हणणे आहे. दुसरीकडे, TVK ने या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
325,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा