लोकसभा निवडणुका अवघ्या काही आठवड्यांवर आलेल्या असताना महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागा वाटपावरून नाराजी असल्याचे दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटात जागावाटपावरून नाराजी नाट्य रंगल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही संजय राऊत खोटे माध्यामांसमोर खोटे बोलत असल्याचा आरोप केला होता. दरम्यान, मविआने वंचितला चार जागांचा प्रस्ताव दिला होता. यावरूनही आता नवा वाद उभा राहिला आहे.
महाविकास आघाडीने चार जागा वंचितला देत असल्याचा दावा केला आहे. यात अकोल्याच्या जागेचा समावेश आहे. यासह अन्य तीन जागा आहेत. अशातच वंचितच्या कार्यकारिणीची पुण्यात बैठक झाली. यामध्ये दोन जागा नाकारण्यात आल्या आहेत. वंचितचे राज्य उपाध्यक्ष, प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. राज्य कार्यकारिणीने एकमताने या जागेंचा प्रस्ताव फेटळला आहे.
हे ही वाचा..
‘माझ्या प्रिय कुटुंबातील सदस्य’ म्हणत नरेंद्र मोदींनी १४० कोटी भारतीयांना उद्देशून लिहिलं पत्र
षटक संपल्यानंतर ६० सेकंदांच्या आत पुढील षटकाला सुरुवात न केल्यास बसणार दंड
लष्कराचे गणवेश विकून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या संशयिताला अटक
“बाल स्वरूपातील मूर्ती साकारताना प्रभू रामचंद्रांनी खूप परीक्षा घेतली”
“आम्ही अकोल्याची जागा सोडण्याची तयारी दर्शविली होती, तरी आम्हाला हरण्याची शक्यता जास्त असलेल्या दोन जागा देण्यात आल्या. या जागा आम्हाला नको,” असे स्पष्टीकरण प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दिले. तसेच मविआच्या फेब्रुवारी महिन्यात अनेक बैठका झाल्या, त्यापैकी एकाही बैठकीला आम्हाला बोलविण्यात आले नाही. मार्चमध्येही बैठका झाल्या, अद्याप आमच्याशी मविआच्या कोणत्याही पक्षाने संवाद साधलेला नाही, अशी माहिती मोकळे यांनी दिली आहे. वंचित काही केवळ त्यांच्या जागा निवडून देण्यासाठी नाही आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. मविआला आमची गरज आहे. वंचितचा मतदार त्यांना हवाय पण वंचितचा उमेदवार नको म्हणून पडणाऱ्या जागा द्यायच्या हे धोरण योग्य नाही, अशी टीका सिद्धार्थ मोकळे यांनी केली. तसेच सुधारित प्रस्ताव द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.