दिल्लीचे तख्त कोण राखणार? सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाची मुसंडी

राजधानी दिल्लीत कोणाची सत्ता येणार याकडे लक्ष

दिल्लीचे तख्त कोण राखणार? सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाची मुसंडी

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडल्यानंतर या निवडणुकांचे निकाल शनिवार, ८ फेब्रुवारी रोजी स्पष्ट होणार आहेत. दिल्लीत यंदा प्रमुख तीन पक्ष भाजपा, आप आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत रंगली होती. त्यामुळे राजधानी दिल्लीत कोणाची सत्ता येणार याकडे लक्ष असणार आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरु आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी करण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनूसार, भाजपाने यंदा दिल्लीत चांगलीच मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे आपही शर्यतीत दिसत असून काँग्रेस मात्र दोन अंकी जागा मिळवण्यास अजूनतरी यशस्वी झालेला दिसत नाही.

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांचे प्राथमिक कल हाती आले आहेत. यानुसार भाजपाकडे बहुमतासह आघाडी आहे तर, त्यामागे आप आहे. काँग्रेस फारच मागे राहिल्याचे दिसत आहे. सकाळी ९.३० वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनूसार, प्राथमिक कालानुसार भाजप ४२, आम आदमी पक्ष २७ आणि काँग्रेस पक्ष १ जागांवर आघाडीवर आहे. दिल्लीत बहुमतासाठी ३६ मॅजिक फिगर गाठणं आवश्यक आहे.

हे ही वाचा:

रडारवरून गायब झालेल्या अलास्कातील विमानाचे अवशेष सापडले; तीन मृतदेह आढळले

उर बडवणार तरी किती?

पंतप्रधान मोदी १२, १३ फेब्रुवारी रोजी अमेरिका दौऱ्यावर जाणार!

सुप्रिया सुळे याच ईव्हीएमवर जिंकल्या, मग राहुल गांधींची नौटंकी का?

लोकसभेमध्ये एकत्र निवडणूक लढलेल्या ‘इंडी’ आघाडीतील आप आणि काँग्रेसने दिल्लीत स्वतंत्र निवडणूक लढवली. यामुळे दिल्लीत तिहेरी लढत पाहायला मिळाली. शिवाय मतविभाजनाचा फटका बसण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली. यापूर्वी २०१५ आणि २०२० च्या निवडणुकीत आम आदमी पार्टीने बहुमतासह दिल्लीत सत्ता मिळवली होती. पण, आता भाजपाच्या आव्हानामुळे हे चित्र पालटण्याची शक्यता आहे.

Exit mobile version