32 C
Mumbai
Tuesday, December 9, 2025
घरराजकारण'आम्ही जी-२३ आहोत, जी हुजूर २३ नाही'

‘आम्ही जी-२३ आहोत, जी हुजूर २३ नाही’

Google News Follow

Related

काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी बुधवारी पक्षाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. “विडंबना अशी आहे की ज्यांना हायकमांडचे जवळचे मानले जात होते त्यांनी त्यांना सोडले आणि इतर अजूनही उभे आहेत. पक्षाला नेत्यांबद्दल पुनर्विचार करावा लागेल. दिल्लीत बसलेल्या २० माणसांकडून लोकशाही काम करू शकत नाही. आम्ही जी-२३ आहोत, जी हुजूर २३ नाही.” असंही ते म्हणाले.” असं म्हणत नाव न घेता त्यांनी गांधी परिवाराला पक्ष पंजाबमध्ये संकटात असताना कानपिचक्या दिल्या.

“मला विश्वास आहे की, माझे एक वरिष्ठ सहकारी काँग्रेस वर्किंग कमिटी ताबडतोब कॉंग्रेस अध्यक्षांना लिहिणार आहेत, जेणेकरून पक्ष आज या  स्थितीत का आहे यावर चर्चा होऊ शकेल.” सध्या कोणताही अध्यक्ष नाही आणि म्हणूनच हे निर्णय कोण घेते कोणालाही  माहित नाही. खरंतर आम्हाला माहित आहे, परंतु अधिकृतपणे आम्हाला काहीच माहिती नाही.” असं सिब्बल म्हणाले.

सिब्बल यांची टिप्पणी अशा वेळी आली आहे जेव्हा पंजाब काँग्रेस अनेक गटांमध्ये विभागली गेली आहे. दररोज एक नवीन नाटक उघड होत आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी “अपमानित होऊन” मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर, चरणजित सिंह चन्नी यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. त्यांच्या नवीन मंत्रिमंडळाने शपथ घेतली. निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी चरणजीत सिंह चन्नी यांनी केलेल्या पदभार वाटपाबद्दल असमाधान व्यक्त करत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

हे ही वाचा:

..आणि रोहित शर्माने क्रिकेट रसिकांच्या हृदयात घर केले

कोण आहेत फुमियो किशिदा?

अमेरिकेचे लष्करी नेतृत्व आणि बायडन यांच्यातच मतभेद?

लडाख सीमेवर चीनची पुन्हा लुडबुड सुरू!

“मला पंजाबबद्दल बोलायचे नाही, पण एक सीमावर्ती राज्य जेथे काँग्रेस पक्षात असे सगळे होत आहे याचा अर्थ काय? आयएसआय आणि पाकिस्तानसाठी हा एक फायदा आहे. आम्हाला पंजाबचा इतिहास आणि तेथील अतिरेक्यांचा उदय माहित आहे. आम्हाला माहित आहे अनिश्चिततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी सीमेपलिकडील शक्ती कशा प्रकारे परिस्थितीचा गैरफायदा घेतात. ही शक्तीच राष्ट्रासाठी सर्वात मोठा धोका आहे. काँग्रेसने हे सुनिश्चित केले पाहिजे की ते एकसंध राहतील. जर कोणाला काही समस्या असेल तर त्यावर चर्चा करावी लागेल.” असं सिब्बल म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा