33 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरक्राईमनामाघरीच नजरकैदेत ठेवण्याची वाझेची विनंती फेटाळली

घरीच नजरकैदेत ठेवण्याची वाझेची विनंती फेटाळली

Google News Follow

Related

अँटिलिया स्फोटकप्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेला बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याने विशेष एनआयए न्यायालयाकडे घरीच नजरकैदेत ठेवण्यात यावे, यासाठी केलेली याचिका फेटाळली. ओपन हार्ट सर्जरीनंतर मला तुरुंगात हवी तशी काळजी घेता येणार नसल्याने आपल्याला नजरकैदेत घरीच ठेवण्यात यावे, असे वाझेच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले होते.

न्यायालयाने नियमित वैद्यकीय तपासणी आणि ज्या वेळी गरज असल्यास वाझेला जेजे रुग्णालयात तपासणीसाठी आणण्याची तसेच घरचे जेवण देण्याची परवानगी दिली आहे. पण घरीच नजरकैदेत ठेवता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. न्यायालयाने सांगितले की, तो तुरुंगातील विशेष रुग्णालयाच्या कक्षात राहू शकतो आणि त्याला घरच्या जेवणाची परवानगी आहे. गरज पडल्यास जेजे रुग्णालयात तपासणीसाठी नेले जाईल

अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सध्या तुरुंगात असलेला बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याने शस्त्रक्रियेनंतर आपल्याला घरीच नजरकैदेत ठेवावे अशी मागणी केली आहे. १३ सप्टेंबरला वाझेवर ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली, त्यानंतर त्याने घरीच ठेवण्यात यावे अशी याचिका केली आहे.

५२ वर्षीय वाझेच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने परवानगी दिली होती. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाल्यावर त्याला अतिदक्षता विभागातून बाहेर आणण्यात आले.

वाझेने याचिका करत शस्त्रक्रियेनंतर तळोजा येथील तुरुंगात ठेवण्यात आल्यास आणखी बाधा होऊ शकतात, हे लक्षात घेऊन घरीच नजरकैदेत ठेवण्याची विनंती केली होती.

हे ही वाचा:

‘आम्ही जी-२३ आहोत, जी हुजूर २३ नाही’

..आणि रोहित शर्माने क्रिकेट रसिकांच्या हृदयात घर केले

सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशचे अधिवेशन २ व ३ ऑक्टोबरला आळंदीत

भारतातील हल्ल्यासाठी पाक दहशतवाद्याला मिळाले होते २० हजार रु.

यासंदर्भात आता एनआयए न्यायालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेला २९ सप्टेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले होते. त्यानुसार बुधवारी सुनावणी झाली. वाझेच्या याचिकेत असेही म्हटले आहे की, त्याला मुंबईतील त्याच्या रुग्णालयाला भेट देण्याची परवानगी मिळावी, तसेच तुरुंगाच्या नियमानुसार त्याला आपल्या वकिलांना भेटण्याचीही मुभा असावी.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा