काँग्रेस खासदार प्रियांका गांधी- वाड्रा या सोमवारी संसदेत ‘पॅलेस्टाईन’ लिहिलेली बॅग घेऊन गेल्या होत्या तर, मंगळवारी बांगलादेशशी संबंधित संदेश असलेली बॅग घेऊन आल्या होत्या. यावरून त्यांच्यावर टीका केली जात असतानाचं आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी काँग्रेस खासदार प्रियांका वाड्रा यांच्यावर ‘पॅलेस्टाईन’ लिहिलेली पिशवी घेऊन आल्याबद्दल सडकून टीका केली. उत्तर प्रदेश तरुणांना इस्रायलला पाठवत आहे आणि काँग्रेस इकडे ‘पॅलेस्टाईन’ची बॅग घेऊन वावरत आहे.
विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, “काँग्रेसच्या एक नेत्या संसदेत पॅलेस्टाईन लिहिलेली पिशवी घेऊन फिरत होत्या आणि आम्ही उत्तर प्रदेशातील तरुणांना इस्रायलला पाठवत आहोत. उत्तर प्रदेशातील ५६०० हून अधिक तरुण इस्रायलला बांधकाम क्षेत्रात काम करण्यासाठी गेले आहेत. इस्रायलमध्ये आतापर्यंत प्रत्येक तरुणाला निवास आणि भोजन मोफत मिळत आहे, दरमहा दीड लाख रुपये पगार आणि संपूर्ण सुरक्षिततेची हमी देखील देण्यात आली आहे.”
काँग्रेस खासदार प्रियांका वाड्रा या ‘पॅलेस्टाईन’ लिहिलेली बॅग घेऊन सोमवार, १६ डिसेंबर रोजी संसदेत पोहचल्या होत्या. यावरून राजकीय वातावरण तापले होते. भाजपाने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. यानंतर मंगळवार, १७ डिसेंबर रोजी प्रियांका गांधी यांनी संसदेत आणलेली त्यांची बॅग पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रियांका वाड्रा या बांगलादेशमधील हिंदू आणि ख्रिश्चनांच्या पाठीशी उभे असल्याचा संदेश असलेली बॅग मंगळवारी संसदेत घेऊन आल्या होत्या.
हे ही वाचा :
उद्धव ठाकरे भेटले फडणवीसांना; अभिनंदनासाठी की विरोधी पक्षनेतेपदासाठी?
राहुल गांधींच्या रायबरेलीत ५२ हजार बनावट जन्म प्रमाणपत्रे सापडली!
आधी विरोध आता उद्धव ठाकरे लाडकी बहीण योजनेसाठी आग्रही!
भारतात फक्त प्रभू रामाच्याच परंपरा राहतील, बाबर-औरंगजेबच्या नाही!
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते संबित पात्रा यांनी ‘पॅलेस्टाईन समर्थक हावभाव’ बद्दल वाड्रा यांच्यावर जोरदार टीका केली आणि ते म्हणाले, “जिथपर्यंत गांधी कुटुंबातील सदस्यांचा प्रश्न आहे, तो काही नवीन नाही. अगदी नेहरूंपासून प्रियंका वड्रापर्यंतचे सदस्य. गांधी परिवार तुष्टीकरणाची झोळी घेऊन फिरतो. त्यांनी कधीच देशभक्तीची पिशवी खांद्यावर टांगलेली नाही. त्यांच्या पराभवामागे हे सामान कारण आहे, असे ते म्हणाले.