29 C
Mumbai
Saturday, January 24, 2026
घरक्राईमनामाआर्यन खान प्रकरणात नवा ट्विस्ट...कोण आहे कुणाल जानी?

आर्यन खान प्रकरणात नवा ट्विस्ट…कोण आहे कुणाल जानी?

Google News Follow

Related

रविवार, २४ ऑक्टोबर रोजी आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणात काही खळबळजनक खुलासे होताना दिसत आहेत. यामध्ये या प्रकरणात कुणाल जानी हे एक नाव पुढे आले. भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये कुणाल जानीचा उल्लेख केला असून हा कुणाल जानी आहे तरी कोण? असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझवरील ड्रग्स छापेमारीप्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर नवनव्या खळबळजनक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. आता एनसीबीच्या एका पंचाने या सगळ्या प्रकरणासंदर्भात एक व्हीडिओ करून त्यात २५ कोटींचे ‘डील’ झाल्याचा आरोप केला आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना त्यात ८ कोटी देण्यात येणार होते, असा आरोपही त्याने केला आहे. या आरोपांचे खंडन समीर वानखेडे यांनी केल्याचे कळते.

यावरून महाविकास आघाडीचे नेते चांगलेच चेकाळले असून शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी ट्विटरवरून एनसीबीवर टीका केली आहे. तर या दोघांनाही भाजपाच्या मोहित कंबोज यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये के.पी. गोसावी यांच्यामागे एक तरूण दिसत आहे. हा तरुण कोण आहे? याचे कुठल्या पक्षाशी लागेबांधे आहेत? कोणत्या राजकीय नेत्याशी हा संबंधित आहे, असे प्रश्न मोहित कंबोज यांनी उपस्थित केले आहेत.

तर पुढच्या ट्विट मध्ये मोहित कंबोज यांनी एनसीपीला विनंती केली आहे की, कुणाल जानीशी संबंधित सर्व मोबाईल रेकॉर्ड आणि व्हाॅट्सॲप संभाषण हे प्रसिद्ध केले जावे. महाराष्ट्र सरकारमधील कोणता कॅबिनेट मंत्री हा त्याचा एकदम खास मित्र आहे. जो त्याच्या रेस्टॉरंट मध्ये कायम जात असतो. कोणत्या चित्रपट अभिनेत्यांसोबत त्याचे संबंध आहेत ते समोर येऊ दे असे मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हे ही वाचा:

समीर वानखेडेंना ८ कोटी देण्यात येणार होते… क्रूझ प्रकरणातील पंच साईलचा दावा

ICC Men’s T20 WC: आज कोणाला ‘मौका’?

‘भविष्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आर्थर रोड तुरुंगात असतील’

विद्यार्थी पोहोचले पण परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक, प्रश्नपत्रिकाच नाहीत!

मोहित कंबोज यांच्या या ट्विटमुळे एकच खळबळ उडाली असून कुणाला जानी आहे तरी कोण? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. तर मोहित कंबोज यांनी आणखीन एक ट्विट करत कुणाल जानी याचा शाहरुख खान आणि गौरी खान सोबतचा फोटो ट्विटर वर टाकला आहे.

या आधी गेल्या वर्षी घडलेल्या सुशांत सिंग राजपूत प्रकरणाच्या वेळ कुणाल जानी याला अटक करण्यात आली असून त्याचे रिया चक्रवर्ती सोबतचे संभाषण समोर आले होते, ज्यामध्ये ते ड्रग्सविषयी बातचीत करत होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा