माजी उच्च शिक्षण आणि माहिती आणि प्रसारण सचिव, १९८५ च्या बॅचचे सनदी अधिकारी अमित खरे यांची मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. खरे ३० सप्टेंबर रोजी सचिव (उच्च शिक्षण) म्हणून सेवानिवृत्त झाले. “मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने अमित खरे, आयएएस (निवृत्त) यांना प्रधानमंत्री कार्यालयात पंतप्रधानांचा सल्लागार म्हणून नियुक्ती मंजूर दिली आहे.” असे सरकारी आदेशात म्हटले आहे.
एक अत्यंत सक्षम नोकरशहा, अमित खरे यांनी पंतप्रधान मोदींच्या निर्देशानुसार राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंमलात आणण्यात मोठी भूमिका बजावली. त्याचबरोबर डिजिटल मीडिया नियमांबाबत सूचना प्रसारण मंत्रालयात महत्त्वाचे बदल घडवून आणण्यातही त्यांचे योगदान होते.
हे ही वाचा:
पाकिस्तानी दहशतवाद्याला केली दिल्लीत अटक
जळगावात फुकटसेनेच्या ‘रणरागिणींचा’ भलताच प्रताप
वाहतूक नियम मोडणाऱ्यांना लावणार जबरदस्त ‘ब्रेक’
एनसीबी संचालक वानखेडे यांच्या मागावर गुप्तहेर
माजी कॅबिनेट सचिव पीके सिन्हा आणि माजी सचिव अमरजीत सिन्हा यांनी यावर्षी सल्लागार म्हणून पीएमओ सोडल्यानंतर ते पंतप्रधान कार्यालयात सामील झाले. खरे यांची ओळख अत्यंत पारदर्शकतेने स्पष्ट निर्णय घेणारे अधिकारी अशी आहे. ते पीएम मोदींच्या नेतृत्वाखालील काही सचिवांपैकी एक होते ज्यांनी उच्च शिक्षण आणि शाळा विभागाचे तसेच सूचना प्रसारण मंत्रालयात काम केले होते.







