34 C
Mumbai
Wednesday, October 27, 2021
घरक्राईमनामापाकिस्तानी दहशतवाद्याला केली दिल्लीत अटक

पाकिस्तानी दहशतवाद्याला केली दिल्लीत अटक

Related

मोठा घातपात टळला

दिल्लीच्या लक्ष्मी नगर येथून एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. दहशतवाद्यांकडून एके-४७ असॉल्ट रायफल, हँड ग्रेनेडसह इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

न्यूज एजन्सी एएनआयने मंगळवारी (१२ ऑक्टोबर २०२१) ही माहिती दिली. दिली. मोहम्मद असरफ अशी त्याची ओळख असून तो पाकिस्तानच्या पंजाबचा रहिवासी आहे.

“दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने लक्ष्मी नगरच्या रमेश पार्कमधून  पाकिस्तानी नागरिकत्वाच्या एका दहशतवाद्याला अटक केली. तो भारतीय नागरिकाच्या बनावट ओळखपत्रासह राहत होता. एक एके-४७ असॉल्ट रायफल, गोळ्यांच्या ६० फैरी, एक हातबॉम्ब, २ अत्याधुनिक ५० राऊंडसह पिस्तूल जप्त करण्यात आल्या आहेत.” असे एएनआयने सांगितले. या दहशत्वाद्याविरुद्ध युएपीए (UAPA) आणि इतर तरतुदी लागू केल्या जात आहेत.

हे ही वाचा:

जळगावात फुकटसेनेच्या ‘रणरागिणींचा’ भलताच प्रताप

वाहतूक नियम मोडणाऱ्यांना लावणार जबरदस्त ‘ब्रेक’

एनसीबी संचालक वानखेडे यांच्या मागावर गुप्तहेर

नरिनच्या अष्टपैलू खेळीने कोलकाताला तारले

लक्ष्मी नगरमधील रमेश पार्क येथील त्याच्या सध्याच्या पत्त्यावर शोधमोहीम राबवण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात दिल्लीत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी उच्च अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन दहशतवादविरोधी उपायांवर चर्चा केल्यानंतर तीन दिवसांनी हे घडले. ९ ऑक्टोबर रोजी त्यांनी दहशतवाद्यांना स्थानिकांचा आधार घेण्यापासून कसे रोखता येईल यावर चर्चा केली.

आदल्या दिवशी, जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात चकमकीदरम्यान लष्कर-ए-तैयबा (एलईटी)/द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) चे किमान तीन दहशतवादी ठार झाले. पोलिसांनी माहिती दिली की त्यांच्या ताब्यातून शस्त्रे आणि दारूगोळा आणि इतर आक्षेपार्ह साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,446अनुयायीअनुकरण करा
4,450सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा