31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरराजकारणप्रतिभा पवार का हसत होत्या ? सुप्रिया सुळे का बोलल्या नाहीत ?

प्रतिभा पवार का हसत होत्या ? सुप्रिया सुळे का बोलल्या नाहीत ?

शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपद सोडल्यानंतर घडला फॅमिली ड्रामा

Google News Follow

Related

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायऊतार होण्याचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली. शरद पवारांनी हा निर्णय मागे घ्यावा म्हणून अनेक ठिकाणी आंदोलने, घोषणाबाजी सुरू झाली आहे. पण शरद पवारांनी ज्या ठिकाणी हा निर्णय घेतला तिथे मात्र वेगळेच नाट्य रंगले.

यशवंतराव चव्हाण केंद्रात शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या चरित्राच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन असताना शरद पवारांनी आपण अध्यक्षपद सोडत असल्याचे आणि नवा अध्यक्ष निवडण्याची सूचना केल्यानंतर उपस्थित कार्यकर्ते, नेते यांच्यात खळबळ उडाली. त्यानंतर सगळे कार्यकर्ते, नेते हे शरद पवारांना घेरून या निर्णयापासून परावृत्त होण्यास सांगू लागले. पण या सगळ्या घडामोडीत शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार या मात्र या सगळ्याकडे हसतमुखपणे पाहात होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेही गंभीर भाव नव्हते. त्यामुळे त्या का हसत आहेत, पवारांच्या या निर्णयामुळे त्या गंभीर का झाल्या नाहीत, असे अनेक प्रश्न निर्माण झाले. यावरून शरद पवार यांचा हा निर्णय प्रतिभा पवार यांच्याशी व कुटुंबाशी चर्चा करून झाला असावा का, असाही मुद्दा समोर येत होता.

त्याचदरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रडत रडत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, धनंजय मुंडे यांनीही भावनिक आवाहन केले आणि शरद पवारांना निर्णयापासून परावृत्त करण्यास सांगितले. पण या सगळ्यात अजित पवारांची भूमिका मात्र वेगळीच दिसली. त्यांनी शरद पवारांच्या या निर्णयाबद्दल आक्षेप असण्याचे कारण नाही. अध्यक्ष बदलल्यामुळे अडचण काय? शरद पवार आपल्याला मार्गदर्शन करणारच आहेत. नवा अध्यक्ष कोण होईल, हेदेखील पवारांच्या मार्गदर्शनाखालीच निश्चित होणार आहे, असे अजित पवार म्हणाले होते.

हे ही वाचा:

मास्टरशेफ ऑस्ट्रेलियाचे परीक्षक झोनफ्रिलोंचे अकाली निधन; अनेकांना धक्का

नवा अध्यक्ष झाला तर काय अडचण आहे… अजित पवारांच्या भूमिकेमुळे सगळेच दचकले!

‘केरळ स्टोरी’तील १० प्रसंग कापले, चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट

भिवंडीतून गायब झालेले बाळ सापडले झारखंडमध्ये

तिकडे सुप्रिया सुळेही याठिकाणी थोड्या उशिरा आल्या पण त्या आल्यानंतर त्यांनाही बोलण्याची विनंती केली जाऊ लागली. तेव्हा अजित पवार यांनी त्यांना दरडावत सुप्रिया तू बोलू नकोस असे सांगितले. मी तुझा भाऊ म्हणून हे सांगतोय, असेही ते म्हणाले होते. यावरून शरद पवारांच्या या निर्णयाबद्दल त्यांच्या कुटुंबियांना माहिती होती का, असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा