28.8 C
Mumbai
Saturday, October 17, 2026
घरराजकारणस्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक सक्षम व्हावे!

स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक सक्षम व्हावे!

अतुल भातखळकर यांचे उद्गार

Google News Follow

स्त्री शिकली कि घर शिकते. स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यानंतर ती सक्षम असते. कोणत्याही अडचणीवर मात करायला तयार असते. त्यामुळे स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाली पाहिजे, या हेतूने भाजप – शिवसेना सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना स्वयंरोजगारासाठीच्या वस्तू मोफत देण्याचा निर्णय केला. महापालिकेचा वाटप कोटा वाढवला. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात या वस्तू वाटप करता आल्या, असे प्रतिपादन भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केले.

कांदिवली पूर्व विधानसभेत हनुमाननगर येथे महिलांना शिलाई मशीन, घरघंटी, मसाला कांडप मशीन वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार भातखळकर यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपचे पदाधिकारी, महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार भातखळकर म्हणाले, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा प्रचंड प्रमाणात या वस्तू वाटप करण्यात येत आहेत, हे केवळ शिंदे-फडणवीस सरकारमुळे शक्य झाले आहे. वस्तूच्या पाच टक्के रक्कम भरून लाभार्थ्यांना वस्तू देण्याचा निर्णय बदलून वस्तू पूर्णतः मोफत देण्याचा निर्णय घेतला. महिलांना आता या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला आहे. यातून त्यांच्या घराला काही ना काही हातभार लागणार आहे.

हे ही वाचा:

तटकरे नवे प्रदेशाध्यक्ष; आव्हाडांना, जयंत पाटलांना हटवले

राष्ट्रवादीच सरकारमध्ये सामील झाल्याने ‘मविआ’ नामशेष !

‘ते’ ९ आमदार वगळता बाकीच्यांना पक्षाची दारे खुली

शपथविधीला उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे सर्व नेते बडतर्फ

महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण योजना अंतर्गत महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून स्वयंरोजगारासाठी या वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी लाभार्थी महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा