भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये सुरू झालेल्या शाब्दिक चकमकीचे रूपांतर गुरुवारी त्यांच्या कार्यकर्त्यांत झालेल्या तुफान राड्यात झाले. ही सगळी घटना चक्क विधिमंडळाच्या लॉबीत घडल्यामुळे एकप्रकारे विधिमंडळाच्या परिसराचे पावित्र्यच भंग झाले आहे का असा सवाल उपस्थित होऊ लागला.
काही दिवसांपूर्वी पडळकर हे विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी संवाद साधत असताना जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या नावाचा उल्लेख न करता ‘मंगळसूत्र चोर’ अशा घोषणा देत पुढे गेले. त्यानंतर या राड्याची सुरुवात झाली.
मग एकेठिकाणी पडळकर यांच्या गाडीच्या दरवाजमुळे आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना धक्का लागल्यामुळे शाब्दिक बाचाबाची झाली. त्यात पडळकर आणि आव्हाड यांनी एकमेकांच्या दिशेने शिव्यांची लाखोली वाहिली. आणि गुरुवारी कार्यकर्तेच विधिमंडळ परिसरात एकमेकांना भिडले. त्याचा व्हीडिओ आता व्हायरल होतो आहे.
हे ही वाचा:
छत्तीसगडच्या सात शहरांना राष्ट्रीय स्वच्छता सन्मान
नोएडा देशातील सर्वात स्वच्छ शहर!
काँग्रेस विघटनवादी राजकारणात गुंतलेला
फर्टिलायझर टास्क फोर्सची मोठी कारवाई
आव्हाडांचा आरोप
याबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी आरोप केला की, मला मारण्यासाठी विधानभवनात गुंड आले होते, मात्र मला न मारता माझ्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाला आहे, विधानभवनात काय सुरू आहे? असा सवाल यावेळी आव्हाड यांनी केला आहे. आव्हाड त्यावेळी पत्रकारावर डाफरले. कुणी पहिला हल्ला केला हे विचारा ना! हा प्रश्न का विचारत नाही, असे ते म्हणत होते. कुणी पहिला हल्ला केला हे मोठ्याने सांगा अशी दमदाटी ते पत्रकारांवर करू लागले.
विधानभवनाच्या लॉबीमध्ये जितेंद्र आव्हाड आणि गोपिचंद पडळकर यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्यात अचानक मारामारी झाली. आव्हाडांच्या कार्यकर्त्याचे शर्ट धरून पडळकर यांच्या कार्यकर्त्याने ओढले, एकमेकांवर हात उगरण्याचाही प्रयत्न झाला.
बुधवारी आव्हाड आणि पडळकरांमध्ये राडा
दरम्यान बुधवारी गोपीचंद पडळकरांच्या गाडीचा दरवाजा लागल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिवीगाळ केल्याचं पाहायला मिळालं.
आव्हाड यांनी सभागृहात हा विषय मांडला आणि संरक्षणाची मागणी केली तसेच अध्यक्षांकडे कारवाईची मागणीही केली. तेव्हा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कुणालाही सोडले नाही असे आश्वासन दिले.







