27 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरराजकारणबार मालकांप्रमाणे शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दलही पत्र लिहा

बार मालकांप्रमाणे शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दलही पत्र लिहा

Google News Follow

Related

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिकांसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांना मदत करण्याची मागणी केली आहे. पवारांच्या या पत्रावर विरोधकांकडून प्रचंड टिका करण्यात येत आहे. भाजपाचे आमदार आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनीही पवार यांना खरमरीत पत्र लिहून जोरदार टीका केली आहे.

अनिल बोंडे यांनी शरद पवार यांना हे पत्रं लिहिलं आहे. हे पत्रं बोंडे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर अपलोड केलं आहे. तसेच या पत्रातून शेतकरी, कामगार, कष्टकरी आणि बारा बलुतेदारांच्या समस्यांकडे पवारांचं लक्ष वेधून या वर्गासाठीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याचा आग्रह धरला आहे.

पवार साहेब, मुख्यमंत्री फक्त तुमचचं ऐकतात. दारुवाल्यांसाठी तुम्ही कळकळीने पत्र लिहिले. दारुवाले तुम्हाला आशीर्वाद देतीलच. किंबहुना दारुवाल्यांच्या आशीर्वादावरच तुमची मदार असेल. परंतु, महाराष्ट्रातील १.५ कोटी शेतकरी कुटुंब अडचणीत आहेत. शेतमजूर सुद्धा सरकारकडे आशेने पाहत आहेत. बारा बलुतेदारांनाही जगण्यासाठी सरकारची मदतीची आवश्यकता आहे. या सर्वांजवळ दारुवाल्यांसारखी मालमत्ता नाही. या सर्व दुखीतांच्या पीडीतांच्या मदतीसाठी पवार साहेब मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहाना, असं चिमटा बोंडे यांनी या पत्रातून काढला आहे.

हे ही वाचा:

व्यापाऱ्यांचे तब्बल ५० हजार कोटींचे नुकसान, अनलॉक होणार?

‘या’ माजी आमदाराला अटक

राज्याच्या अधिकारातील सवलती तातडीने मराठा समाजाला द्या

संभाजी ब्रिगेडकडून राष्ट्रवादीला घरचा आहेर

महाराष्ट्रातील शेतकरी या वर्षी संकटात आहेत. करोनामुळं कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद आहेत. धान्य, कांदा, भाजीपाला सुद्धा विकता येत नाही. शेतातून माल काढूनही विकला जात नाही. काही काळासाठी तरी शेतकऱ्यांना विक्री करण्याची सवलत देण्यासाठी पवार साहेब मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहाना, असं सांगतानाच अवकाळीची नुकसान भरपाई अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाही. हेक्टरी २५ हजार रुपये मदतीची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवला आणि १० हजार रुपये हेक्टरवर बोळवण केली. अतिवृष्टीचे निकष लावून अवकाळीनं बाधित शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आलं. गेल्या दोन महिन्यांत विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा अवकाळी पाऊस, वादळं झालीत. शेतकऱ्यांचा कांदा, आंबा याचं अतोनात नुकसान झालं. परंतु सरकारनं साधी दाखलही घेतली नाही. या अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा