मणिपूर राज्याला अखेर जवळपास एक वर्षानंतर नवे नेतृत्व मिळाले आहे. भारतीय जनता पक्षाने आपल्या विधानसभेतील गटनेतेपदी युमनाम खेमचंद सिंह यांची निवड केली असून, तेच आता मणिपूरचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय अनिश्चिततेवर या निर्णयामुळे पडदा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मणिपूरमध्ये यापूर्वी मुख्यमंत्री असलेले एन. बिरेन सिंग यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राज्यात सरकार स्थापन न झाल्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. या काळात राज्याचा कारभार थेट केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली होता. परिणामी, अनेक धोरणात्मक निर्णय रखडले आणि लोकनियुक्त सरकार नसल्याने प्रशासनावर टीकाही होत होती.
हे ही वाचा:
एअर इंडियाचे ड्रीमलाइनर विमान सुरक्षित
“चिकन नेक” कॉरिडॉर अधिक सुरक्षित! भूमिगत रेल्वे ट्रॅक बनवणार
तेहरानची बाजारपेठ पेटली, शेकडो मैलांपर्यंत धूराचे ढग
लोकसभेतून ८ काँग्रेस खासदारांचे निलंबन
या पार्श्वभूमीवर भाजपाने राज्यात पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत भाजपाच्या आमदारांनी युन्नाम खेमचंद सिंग यांची विधानसभेतील गटनेतेपदी निवड केली. गटनेतेपद मिळाल्याने मुख्यमंत्रीपदाचा मार्ग त्यांच्यासाठी मोकळा झाला आहे. लवकरच ते मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.
युन्नाम खेमचंद सिंग हे मणिपूरमधील अनुभवी आणि ज्येष्ठ राजकीय नेते मानले जातात. त्यांनी यापूर्वी मणिपुर विधानसभेचे अध्यक्ष (स्पीकर) म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. तसेच राज्य सरकारमध्ये मंत्रीपदाची धुराही त्यांनी सांभाळली आहे. प्रशासनाचा अनुभव, पक्षातील पकड आणि वरिष्ठ नेतृत्वाचा विश्वास या सर्व बाबी त्यांच्या निवडीमागे महत्त्वाच्या ठरल्याचे मानले जाते.
मणिपुरमध्ये गेल्या काही वर्षांपासून जातीय तणाव, सामाजिक संघर्ष आणि हिंसाचार पाहायला मिळाला. विविध समुदायांमधील मतभेदांमुळे कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडली होती. या परिस्थितीचा थेट परिणाम राजकारणावर झाला आणि सरकार टिकवणे कठीण बनले. त्यामुळेच मुख्यमंत्री निवडीचा निर्णय दीर्घकाळ लांबला.







