26.4 C
Mumbai
Wednesday, October 28, 2026
घरस्पोर्ट्सअनाहत सिंहची विश्वविजेती झेप

अनाहत सिंहची विश्वविजेती झेप

ज्युनिअर स्क्वॉश विश्वविजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय

Google News Follow

भारतीय स्क्वॉशला अभिमानाचा क्षण देत दिल्लीच्या युवा स्टार अनाहत सिंहने जागतिक क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल अशी कामगिरी केली आहे. कॅनडातील ओंटारियो येथे झालेल्या वर्ल्ड ज्युनिअर स्क्वॉश चॅम्पियनशिपमध्ये तिने अंतिम फेरीत इजिप्तच्या दुसऱ्या मानांकित रुकय्या सालेमचा ११-३, ११-७, ११-९ अशा सरळ गेममध्ये पराभव करत विश्वविजेतेपद पटकावले. या विजयासह अनाहत ही ज्युनिअर स्क्वॉश विश्वचषक जिंकणारी भारताची पहिली खेळाडू ठरली आहे.

अनाहतसाठी हा विजय विशेष ठरला कारण हा तिचा या स्पर्धेतील पाचवा प्रयत्न होता. याआधी अनेक वेळा उपांत्य किंवा उपांत्यपूर्व फेरीत तिची मोहीम थांबली होती. मात्र अखेरच्या संधीचे तिने सोने केले. अंतिम सामन्याच्या सुरुवातीपासूनच तिने आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व गाजवले. तिसऱ्या गेममध्ये काही काळ ती पिछाडीवर पडली होती, पण शांतपणे पुनरागमन करत सलग गुण मिळवले आणि विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
हे ही वाचा:
रशिया-युक्रेन संघर्ष पुन्हा भडकला

राम काय तुमच्या बापाचा आहे का? आम्हीच रामभक्त

पोलिसांनी फाडला रोहित पवार, अंधारे, गायकवाडांचा बुरखा

एका रात्रीतला थरार जंतर मंतर, छू मंतर..

अनाहतच्या या ऐतिहासिक विजयाने इजिप्तचे अनेक वर्षांचे वर्चस्वही संपुष्टात आले. गेल्या १३ वर्षांपासून या स्पर्धेत इजिप्तच्या खेळाडूंचीच सरशी होत होती. त्यामुळे भारतासाठीच नव्हे, तर जागतिक स्क्वॉशमध्येही हा निकाल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

विजयानंतर भावना व्यक्त करताना अनाहत म्हणाली, “हा क्षण अजूनही स्वप्नवत वाटतो. या स्पर्धेत मला प्रत्येक वेळी निराशा मिळाली होती. त्यामुळे यावेळी फक्त माझा खेळ खेळायचा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा, एवढाच विचार मनात होता.” तिच्या या जिद्दीला अखेर जागतिक यशाचे फळ मिळाले.

अवघ्या १८ वर्षांच्या अनाहतने यापूर्वी आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा आणि व्यावसायिक स्क्वॉश स्पर्धांमध्येही उल्लेखनीय यश मिळवले आहे. आता विश्व ज्युनिअर विजेतेपदामुळे भारतीय स्क्वॉशला नवी ओळख मिळाली असून, आगामी वरिष्ठ जागतिक स्पर्धांमध्येही तिच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. अनाहत सिंहच्या या ऐतिहासिक यशाने भारतीय क्रीडाक्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा