28 C
Mumbai
Thursday, February 19, 2026
घरस्पोर्ट्सकांगारू उडाले, लंका जळाली… झिम्बाब्वेचा धिंगाणा सुरुच!

कांगारू उडाले, लंका जळाली… झिम्बाब्वेचा धिंगाणा सुरुच!

Google News Follow

Related

टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये झिम्बाब्वेने आणखी एक मोठा उलटफेर करत श्रीलंकेचा ६ विकेट्सनी पराभव केला. आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात झिम्बाब्वेने १९.३ षटकांत लक्ष्य गाठत दणदणीत विजय मिळवला.

ग्रुप टप्प्यात झिम्बाब्वेने ४ पैकी ३ सामने जिंकले, तर १ सामना पावसामुळे रद्द झाला. यापूर्वी त्यांनी ओमानला ८ विकेट्सनी हरवले होते, तर ऑस्ट्रेलियावर २३ धावांनी मात करत मोठा धक्का दिला होता.

टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ७ विकेट्स गमावत १७८ धावा केल्या. कुसल परेरा आणि पथुम निसांका यांनी ५ षटकांत ५४ धावांची दमदार भागीदारी करत संघाला वेगवान सुरुवात करून दिली. निसांकाने ४१ चेंडूत ८ चौकारांसह ६२ धावा केल्या, तर पवन रत्नायकेने २५ चेंडूत ४४ धावांची महत्त्वाची खेळी साकारली.

झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुजारबानी, ब्रॅड इव्हान्स आणि ग्रीम क्रेमर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

१७९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ब्रायन बेनेट आणि तदिवानाशे मारुमानी यांनी ८.३ षटकांत ६९ धावांची सलामी भागीदारी केली. बेनेटने ४८ चेंडूत ८ चौकारांसह नाबाद ६३ धावा ठोकत संघाला विजय मिळवून दिला. कर्णधार सिकंदर रझाने २६ चेंडूत ४ षटकार आणि २ चौकारांसह ४५ धावांचे योगदान दिले.

या विजयासह झिम्बाब्वेने सुपर-८ मध्ये दमदार प्रवेश केला असून त्यांचा आत्मविश्वास सध्या शिगेला पोहोचला आहे. वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वेचा धडाका पाहता आता पुढचा धक्का कोणाला बसणार, याचीच चर्चा रंगू लागली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
294,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा